|
|
नवी देहली – जम्मू-काश्मीर पोलिसांनी ५८ मिनिटांची ‘द अनटोल्ड कश्मीर फाइल’ नावाची एक चित्रफीत प्रसारित केली आहे. यात आतंकवादाच्या झळा सर्वधर्मीय काश्मिरी लोकांना कशा पोचल्या, याचे चित्रीकरण आहे. ४ एप्रिल या दिवशी काश्मीर खोर्यात काश्मिरी हिंदू आणि स्थलांतरित यांच्यावर आक्रमणांच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ही चित्रफीत प्रसारित केली.
सौजन्य इंडिया अहेड
सध्या चर्चेत असलेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर ‘द अनटोल्ड कश्मीर फाइल’ चित्रफीत बनवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले की, शोकसंतप्त काश्मिरी नागरिकांचे छायाचित्र दाखवून या चित्रफितीत माहिती दिलेली आहे की, काश्मीरने आतापर्यंत २० सहस्र नागरिकांना आतंकवादी आक्रमणांत गमावले आहे.
(म्हणे) ‘काश्मीरवासियांत विश्वासनिर्मितीचा प्रयत्न !’ – काश्मीरमधील एक प्रशासकीय अधिकारी
अशा चित्रफिती काढून नव्हे, तर धर्मांध ज्या वेळी त्यांनी जिहादी मनोवृत्ती त्यागतील, त्याच वेळी खर्या अर्थाने काश्मीरमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल, हे निश्चित ! – – संपादक दैनिक सनातन प्रभात
जम्मू-काश्मीरच्या एका प्रशासकीय अधिकार्याने सांगितले, ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात ठराविक अंगाचेच कथानक दाखवले आहे; पण काश्मीर खोर्यात त्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. येथील सर्व जण राष्ट्रीय वृत्तवाहिन्या पहातात. त्यामुळे या चित्रपटावरून येथे वाढती अस्वस्थता आहे. खरेतर सध्या आंतरराष्ट्रीय आर्थिक कृती दलाने (‘फायनॅन्शियल अॅक्शन टास्क फोर्स’ने) आतंकवादाला आर्थिक रसद पुरवल्याच्या संशयावरून पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्ये (करड्या सूचीत) टाकून त्याच्याकडे खुलासा मागितला आहे. त्यामुळे पाकचा काश्मीरमधील हस्तक्षेप सध्या तुलनेने थंडावला आहे. या पार्श्वभूमीवर काश्मिरी जनतेच्या जखमांवर मलम लावण्याची ही योग्य वेळ असतांना ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रसारित झाला. त्यामुळे ‘द अनटोल्ड कश्मीर फाइल’ चित्रफितीद्वारे काश्मिरी जनतेत विश्वासाचे वातावरण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.’