Menu Close

जिहादी आतंकवादी हाफिज सईद याला आणखी ३२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

पाकची ‘आतंकवाद्यांचा देश’ अशी ओळख झाल्यामुळे त्याच्यावर जागतिक स्तरावर निर्बंध लागू होत आहेत. ‘आम्ही आतंकवाद्यांच्या विरोधात काही तरी करतो’, हे जगाला दाखवण्यासाठी पाकने केलेली ही कारवाई आहे. याला आंतरराष्ट्रीय समुदायाने भुलू नये !

नवी देहली –  मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याला पाकिस्तानातील आतंकवादविरोधी न्यायालयाने ३२ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्याला ३ लाख ४० सहस्र रुपये इतका दंडही ठोठावला आहे. आतंकवाद्यांना आर्थिक साहाय्य केल्याच्या २ प्रकरणांत त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. हाफिजचे वय आता ७० वर्षे असून त्याला याआधीच्या ५ खटल्यात ३६ वर्षांचा कारावास सुनावण्यात आला आहे. त्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा कालावधी आता ६८ वर्षे झाला असून या शिक्षा त्याला एकाच वेळी भोगायच्या आहेत.

भारताकडून हाफिज सईद याचा मुलगा ‘आतंकवादी’ घोषित !

हाफिज सईद याचा मुलगा हाफिज तलहा सईद याला भारताच्या गृह मंत्रालयाने ‘आतंकवादी’ घोषित केले आहे. (आतंकवाद्यांना ‘आतंकवादी’ घोषित करून त्यांचे फार काही बिघडणार नाही. पाकमध्ये घुसून त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना भारतात आणून शिक्षा सुनावली, तरच भारतात शांती नांदेल ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) तलहा हा लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ नेता होता. तलहा सईद भारत आणि अफगाणिस्तान येथे कारवाया करण्यासाठी आतंकवाद्यांची भरती करणे, निधी उभारणे, योजना आखणे आणि आक्रमण करणे यात सक्रीयपणे सहभागी होता.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *