Menu Close

श्रीनगरच्या मशिदीबाहेर धर्मांधांकडून भारतविरोधी घोषणाबाजी

सुरक्षादलांवर दगडफेक

  • जिहादी आतंकवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना धर्म असतो आणि ते त्यांच्या धार्मिक स्थळांमध्ये भारतविरोधी कृत्य करत असतात, त्याचेच हे एक उदाहरण ! याविषयी देशातील ढोंगी निधर्मीवादी कधीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • सुरक्षादलांवर दगडफेक करणार्‍यांवर आता गोळीबार करण्याची अनुमती दिली पाहिजे, तरच या घटना कायमच्या थांबतील !

 

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथील सर्वांत मोठ्या जामिया मशिदीमध्ये शुक्रवार, ८ एप्रिल या दिवशी धर्मांधांनी भारतविरोधी घोषणाबाजी करत स्वातंत्र्याची मागणी केली. येथे शुक्रवारच्या नमाजासाठी जमलेल्या धर्मांधांनी या घोषणा दिल्या. त्या वेळी त्यांनी वर्ष २०१९ मध्ये ठार करण्यात आलेला आतंकवादी झाकीर मुसा याच्या समर्थनार्थही घोषणा दिल्या. मुसा हा आतंकवादी संघटना ‘अंसार गजवात-उल-हिंद’चा प्रमुख होता. धर्मांधांनी या वेळी सुरक्षादलांवर दगडफेकही केली.

सौजन्य : Republic World

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *