Menu Close

उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या धर्मांतराच्या २ घटनांमध्ये धर्मांध डॉक्टर आणि मौलवी यांना अटक

देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने हिंदूंचे धर्मांतर करण्याचा उघडपणे प्रयत्न केला जात आहे आणि त्याला हिंदू बळी पडत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ हा कायदा करावा !

 

इटावा (उत्तरप्रदेश) – येथे एका धर्मांध डॉक्टरने त्याच्या हिंदु कर्मचार्‍याचे धर्मांतर केले. दुसरीकडे रामपूर जिल्ह्यात एका मौलवीने (इस्लामच्या धार्मिक नेत्याने)  एका हिंदूला धर्मांतर करण्यासाठी आमीष दाखवल्यावरून त्याला आणि त्याच्या सहकार्‍याला अटक करण्यात आली.

१. इटावा येथे रामराज यादव यांनी केलेल्या तक्रारीनुसार डॉ. फारुखी कमाल याने त्यांना मुसलमान बनण्यासाठी बाध्य केले. वर्ष २०१९ मध्ये धर्मांतर केल्यानंतर त्यांचे नाव करम हुसेन ठेवण्यात आले होते.

२. रामपूरच्या नालापार येथे रहाणारे लेख सिंह यांनी केलेल्या तक्रारीनंतर मौलवी गुलवेज आणि नदीम यांनी त्यांच्या मुलाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्यावरून दोघांना अटक करण्यात आली. या दोघांमुळे लेख सिंह यांचा मुलगा घरी नमाजपठण करू लागला होता आणि रमझानच्या काळात उपवास करत होता.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *