Menu Close

जम्मूमधील लक्ष्मीनारायण मंदिरावर आक्रमण करून मूर्तींची तोडफोड

काश्मीरच नव्हे, तर जम्मूमध्येही हिंदू आणि त्यांची मंदिरे असुरक्षित ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

 

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात

जम्मू – येथील मुसलमानबहुल भागातील लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये अज्ञातांनी आक्रमण करून मंदिरातील ६ मूर्तींची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यात श्री गणेश आणि नरसिंह या देवतांच्याही मूर्तींचा समावेश आहे.

पोलीस येथील सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाद्वारे आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध घेत आहेत. हे मंदिर तावी नदीच्या किनारी असलेल्या जंगल क्षेत्रामध्ये आहे. स्थानिक लोकांनी सांगितले की, ५ वर्षांपूर्वीही या मंदिरावर आक्रमण करण्यात आले होते. तेव्हा मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या मूर्तीची हानी करण्यात आली होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *