देशातील धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
मुंबई – श्रीरामनवमीच्या दिनी अनेक राज्यांत मिरवणुकांवर दगडफेक करत भीषण आक्रमण करण्याचे प्रकार घडले. राजस्थान, झारखंड, बंगाल, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आदी अनेक राज्यांत धर्मांध मुसलमानांकडून हे आक्रमण करण्यात आले. एकीकडे देशात तणाव आणि धर्मांधता वाढत असल्याचे कारण सांगून हिंदु संत-धर्माचार्य यांच्यावर कारवाईची मागणी साम्यवादी, धर्मनिरपेक्षतावादी पुरोगामी सतत करत असतात; मात्र हिंदूंच्या सणांच्या वेळी धर्मांधांकडून झालेल्या आक्रमणांविषयी ही मंडळी सोयीस्करपणे मौन बाळगतात. मूर्तीभंजक मोगलांचा इतिहास हा सर्वश्रृतच आहे. भारतातील लाखो मंदिरांवर मोगलांनी आक्रमण करून ती नष्ट आणि भ्रष्ट केली, तसेच सहस्रो मंदिरांवर आक्रमण करून त्याठिकाणी मशिदी बांधल्या आहेत. नुकतेच श्रीरामजन्मभूमी प्रकरण सर्वाेच्च न्यायालयाने निकाली काढून श्रीराम मंदिराची पायाभरणी चालू असतांना काही धर्मांधांना श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांवर देशभरात आक्रमणे केली. हा प्रकार अत्यंत गंभीर असून केंद्र सरकारने याप्रकरणी तात्काळ नोंद घ्यायला हवी. हिंदूंच्या संयमाचा अंत कुणी पाहू नये. श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणारे मूर्तीभंजक मोगलांचेच वंशज असून या प्रकरणी या प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,
१. देशभरात हिंदूंच्या सणांच्या वेळी घडणारे हे प्रकार संतापजनक आहेत, तरी कोणत्याही मोठ्या प्रसारमाध्यमांमध्ये याविषयी विशेष चर्चा होतांना दिसत नाही. गेल्याच आठवड्यात राजस्थानमधील करौली येथे गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या हिंदू नववर्षयात्रेवर धर्मांधांनी भीषण आक्रमणे केले. तेथील अनेक हिंदु दुकानदार स्वत:चे दुकान विकून जाण्याच्या सिद्धतेत आहेत. म्हणजे वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये हिंदूंसमवेत जे घडले, ते भारतात अन्यत्रही घडू लागले आहे. यापूर्वीही नवरात्री आणि अन्य सणांच्या वेळीही अशीच आक्रमणे सातत्याने झालेली आहेत.
२. ‘जेएनयू’मध्ये तर महिषासुराची जयंती साजरी करण्यापासून ‘भारत तेरे तुकडे होंगे ।’ या घोषणा दिलेल्या चालतात; मात्र ‘जय श्रीराम’ची घोषणा आणि रामनवमीची पूजा केलेली चालत नाही. जेएन्यूमध्येही काल हिंसक घटना घडली. देशभरात घडणाऱ्या घटना पहाता हे एक सुनियोजित षड्यंत्र आहे, असेच लक्षात येते. तरी आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या घटनांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.