‘धर्मांधांचा विरोध होईल’ म्हणून पोलिसांनी फलक झाकायला लावला !
‘धार्मिक दंगली होतील’ म्हणून शिवछत्रपतींचा अफझलखानवधाचा पराक्रम महाराष्ट्रात झाकतात. उच्च न्यायालयाच्या मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या आदेशाची कारवाई करण्यासही न धजावणाऱ्या पोलीसांकडून आणखी कोणती अपेक्षा करणार ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
१९९० च्या दशकात काश्मीर खोऱ्यातून लक्षावधी हिंदूंचा वंशविच्छेद झाला. अनेक राज्यांत हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. मुसलमानबहुल भागांत त्यांना जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे. या वास्तवावर पोलीस यंत्रणेकडून काहीच करण्यात न येणे, हे देशासाठी लज्जास्पद ! – संपादक दैनिक सनातन प्रभात |
मुंबई – धारावी येथे श्रीरामनवमीच्या दिवशी ‘वज्रदल’ या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत ‘हिंदू पलायन – हिंदू घटा.. देश बटा’, असे लिहिलेला फलक ‘धर्मांधांचा विरोध होईल’, या भीतीने पोलिसांनी झाकायला लावला. फलक झाकून ठेवेपर्यंत पोलिसांनी शोभायात्रा रोखून धरली. पोलिसांनी शोभायात्रेच्या मार्गातील मुसलमानबहुल भाग पार केल्यानंतर फलकावरील आच्छादन काढण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात मात्र शोभायात्रा संपेपर्यंत हिंदुत्वनिष्ठांना फलक झाकून ठेवण्यास भाग पाडले गेले. फलकावर भारताचा नकाशा छापून त्यावर मुसलमानबहुल झालेली भारताची राज्ये हिरव्या रंगाने दाखवण्यात आली होती.
१० एप्रिल या दिवशी धारावी येथील ‘वज्रदल’ या संघटनेच्या वतीने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. विविध संघटनांचे एकूण ५०० हून अधिक धर्मप्रेमी हिंदू आणि भाविक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. शोभायात्रेच्या प्रारंभी ‘हिंदू पलायन – हिंदू घटा.. देश बटा’ हा फलक पाहून धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत पाटील यांनी हा फलक काढून टाकण्यास किंवा झाकण्यास सांगितले; मात्र हिंदुत्वनिष्ठांनी त्याला विरोध दर्शवला. त्यामुळे पोलिसांनी शोभायात्रा रोखून धरली होती.
हिंदूबहुल भागातही फलक झाकायला लावला !
प्रारंभी पोलिसांनी काही अंतर गेल्यावर फलकावरील आच्छादन काढण्यास अनुमती दिली. त्याप्रमाणे हिंदूबहुल भागात आल्यावर आयोजकांनी फलकावरील आच्छादन हटवले; मात्र त्या वेळी १०-१२ पोलिसांनी फलक असलेले वाहन रोखून धरले. त्यामुळे आयोजकांना नाईलाजास्तव फलक पुन्हा झाकावा लागला.
यापूर्वी अफझलखानवध आणि गोहत्या यांविषयीचे फलकही पोलिसांनी काढायला लावले होते ! – संजय चिंदरकर, वज्रदल
यापूर्वीच्या श्रीरामनवमीच्या वेळी आम्ही अफझलखानवध, तसेच गोहत्या करणारे कसाई यांचे फलक केले होते; मात्र हे फलकही पोलिसांनी काढायला लावले. हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येविषयीच्या फलकाविषयी कुणी आक्षेप घेतला का ? असे आम्ही पोलिसांना विचारले; मात्र तसा आक्षेप कुणीही घेतलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.