Menu Close

‘एम्.आय.एम्.’ पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष महंमद रुवेद यांची हिंदु धर्म स्वीकारण्याची चेतावणी

घरातील संपत्तीच्या वादामुळे त्रस्त होऊन दिली चेतावणी !

हिंदु धर्माची महानता जाणून नव्हे, तर स्वतः समस्यांनी ग्रस्त असल्यामुळे आणि त्याच्या निवारणासाठी स्वतःच्या समाजाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे स्वार्थापोटी हिंदु धर्म स्वीकारून रुवेद यांना काय साध्य होणार ? भावनेपोटी हिंदु धर्म स्वीकारण्याची भाषा करणाऱ्यांपासून हिंदूंनी लांब राहिलेलेच इष्ट !

महंमद रुवेद आणि पत्नी समीना परवीन

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील ‘एम्.आय.एम्.’ (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष महंमद रुवेद आणि त्यांची पत्नी समीना परवीन यांनी घरातील संपत्तीच्या वादामुळे त्रस्त होऊन हिंदु धर्म स्वीकारण्याची चेतावणी दिली. यासंदर्भात त्यांनी नुकतेच स्थानिक पोलिसांना निवेदन दिले असून न्याय देण्याची मागणी केली आहे.

रुवेद यांनी म्हटले, ‘माझ्या घराची किंमत अनुमाने १ कोटी रुपये आहे. त्यामुळे माझ्या ३ बहिणी आणि जावई यांना या घरावर ताबा मिळवायचा आहे. त्यासाठी मला घरातून बाहेर काढायचा प्रयत्न होत आहे.’ रुवेद यांनी सांगितले, ‘कुटुंबातील लोकांनी माझ्या विरोधात तक्रार केल्याने पोलीसही मला त्रास देत आहेत.’ महंमद रुवेद यांची पत्नी समीना यांनी सांगितले, ‘याविषयी आम्ही मुसलमान समाजातील सर्वच मोठ्या लोकांशी संवाद साधला; पण कुणीच आम्हाला साहाय्य केले नाही. त्यामुळे आम्हाला आता हिंदु बनायचे आहे.’’

रुवेद यांचे वडीलही त्यांच्यावर नाखूश आहेत. ते म्हणाले, ‘‘रुवेद यांनी कोणताही धर्म स्वीकारला, तरी मला कोणतीही अडचण नाही. आम्हाला केवळ त्यांच्यामुळे होणऱ्या त्रासापासून मुक्ती हवी आहे. त्यांनी एम्.आय.एम्.च्या तिकिटावर २ वेळा निवडणूक लढली आहे आणि दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला आहे.’’

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *