Menu Close

उत्तराखंडच्या रुद्रनाथ मंदिरात तोडफोड !

  • पुजाऱ्याच्या घराचीही तोडफोड

  • मद्याच्या बाटल्या सापडल्या

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होण्याच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने विशेषतः हिमालयात असणाऱ्या अशा मंदिरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

चमोली (उत्तराखंड) – येथील प्राचीन रुद्रनाथ मंदिरामध्ये तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुजारी आणि अन्य काही लोक यांच्या घरांचीही तोडफोड करण्यात आली. येथे मद्याच्याही बाटल्या सापडल्या. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. ही घटना ९ एप्रिल या दिवशी घडल्याचे सांगितले जात आहे.

मंदिराचे पुजारी हरीश भट्ट यांनी सांगितले की, हिवाळ्याच्या दिवसात हे मंदिर बंद असते. आता जेव्हा हे मंदिर उघडण्यात येत होते, तेव्हा काही लोक येथे आले आणि त्यांनी मंदिराची तोडफोड झाली असल्याची माहिती आम्हाला दिली. केदारनाथ वन विभागाने या मंदिराच्या ठिकाणी त्यांचे गस्तीपथक पाठवल्यावर येथे रहिवासी भागातही तोडफोड झाल्याचे दिसून आले.

या प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत चौथ्यांदा या मंदिरामध्ये तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत याची माहिती पोचवली पाहिजे. हा भाग आता पर्यटनाचे स्थान झाले आहे. येथे मद्याच्या बाटल्याही सापडतात. येथे गोव्याची संस्कृती आली आहे. लहान मुलेही मद्य पिऊन जातात. याविषयी सर्वच धर्मगुरूंनी बोलले पाहिजे. प्रशासनाने कारवाई केली पाहिजे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *