Menu Close

श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर देशातील ५ राज्यांत धर्मांधांकडून आक्रमणे !

  • एका हिंदू ठार, तर पोलीस अधीक्षकांसह अनेक जण घायाळ !

  • मध्यप्रदेश येथे आक्रमण करणार्‍या धर्मांधांची घरे प्रशासनाने पाडली !

हिंदूंच्या देशात हिंदूंच्याच धार्मिक मिरवणुकांवर आक्रमण करण्याचे धाडस गेली अनेक वर्षे केले जात आहे. ही स्थिती पालटण्यासाठी आता हिंदूंनी युद्धपातळीवर वैध मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत. यापुढे धर्मांधांकडून असे धाडस होणार नाही, अशी स्थिती निर्माण केली पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

 

नवी देहली – देशभर श्रीरामनवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर मुसलमानबहुल भागांत आक्रमण करण्यात आल्याच्या घटना झारखंड, मध्यप्रदेश, बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांत घडल्या. गुजरातमध्ये धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात १ हिंदू ठार झाला.

गुजरात राज्यातील आणंद आणि साबरकांठा जिल्ह्यांत आक्रमण

 

गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील हिंमतनगरच्या छपरिया भागात मुसलमानबहुल भागातून श्रीरामनवमीची मिरवणूक जात असतांना त्यावर अचानक दगडफेक करण्यात आली. या वेळी स्थितीवर नियंत्रण मिवळण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या वेळी धर्मांधांनी पोलिसांच्या वाहानांचीही हानी केली.

आणंद जिल्ह्यातील खंभातमधील शकरपूरमध्ये मुसलमानबहुल भागात श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर धर्मांधांनी दुकाने, घरे आणि वाहने यांची जाळपोळ केली. या वेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्यांनी प्रत्युत्तर म्हणून धर्मांधांवर दगडफेक केली. या वेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या हिंसाचारात अनेक जण घायाळ झाले. यात एका ६५ वर्षीय हिंदु व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

बंगालच्या हावडा आणि बांकुरा येथे आक्रमणे

 

हावडा जिल्ह्यातील बीई महाविद्यालयाजवळ विश्‍व हिंदु परिषदेने श्रीरामनवमीच्या निमित्ताने मिरवणूक काढली होती. ती मुसलमानबहुल भागातून जात असतांना तिच्यावर अचानक आक्रमण करण्यात आले. त्या वेळी पोलिसांनी हिंदूंवरच लाठीमार केला. यात काही जण घायाळ झाले. याविषयी भाजपचे आमदार शुभेंदू अधिकारी यांनी ट्वीट करून, ‘सनातन धर्माचे पालन करणे राज्यात निषिद्ध आहे का ?’, असा प्रश्‍न विचारला आहे.

बांकुरा येथे केंद्रीय राज्यमंत्री सुभाष सरकार यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढण्यात आली होती. तिच्यावर मशिदीवरून दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी १७ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, मिरवणुकीच्या मार्गामध्ये मशीद असल्याने तिला वेगळ्या मार्गाने नेण्याचे सांगण्यात आले होते; मात्र हिंदूंनी ते ऐकले नाही आणि ते मशिदीच्या मार्गाने मिरवणूक घेऊन गेल्यावर दगडफेक करण्यात आली. यामुळे लाठीमार करण्यात आला. (भारत धर्मनिरपेक्ष देश आहे आणि येथे प्रत्येकाला सर्वधर्मसमभावाचे उपदेश केले जातात, तर मग हिंदूंच्या मिरवणुका मशिदीसमोरून गेल्या तर यात चुकीचे काय आहे ? आणि तेथे मिरवणुकांवर आक्रमण होत असेल, तर पोलिसांनी अशांवर आधीच कारवाई केली पाहिजे आणि त्यांना सर्वधर्मसमभाव शिकवला पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

झारखंड येथे जाळपोळ

 

झारखंड राज्यातील लोहरदगामधील हिरही-हेंदलासो-कुजरा या गावाच्या सीमेवर लागणार्‍या मेळ्यामध्ये हिंसाचार आणि जाळपोळ करण्यात आली. या गावात श्रीरामनवमीच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावर झालेल्या दगडफेकीनंतर जाळपोळीची घटना घडली. यात १० दुचाकी आणि एक पिकअप व्हॅन यांना जाळण्यात आले. या हिंचासारात ४ जण घायाळ झाले. बोकारो येथील बेरमो भागातही मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली.

मध्यप्रदेशातील बडवानी आणि खरगोन येथे हिंसाचार

मध्यप्रदेशच्या बडवानी जिल्ह्यातील सेंधवा येथे मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. यात पोलीस अधिकारी आणि अन्य २० जण घायाळ झाले. धर्मांधांनी या वेळी काही गाड्यांची जाळपोळ केली. तसेच ३ मंदिरांची तोडफोड केली. येथे सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राज्यातील खरगोन येथे मुसलमानबहुल भागात धर्मांधांनी मिरवणुकीवर दगडफेक, तसेच पेट्रोल बाँबद्वारे आक्रमण केल्यावर बंदोबस्ताला असणारे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ चौधरी, तसेच पोलीस निरीक्षक घायाळ झाले. तसेच अन्य ४ जणही घायाळ झाले. दगडफेकीला हिंदूंनीही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. यानंतर शहरातील अन्य ३ ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. यात तालाब चौक, गोशाळा मार्ग आणि मोतीपुरा भागात या घटना घडल्या. येथे आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मिरवणुकीमध्ये ‘डिजे’ (मोठी संगीत यंत्रणा) लावण्यात आले होते. मुसलमानबहुल भागात धर्मांधांनी डिजे बंद करण्यास सांगितले आणि दगडफेक केली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या येथील काही भागात जमावबंदी लावण्यात आली आहे.

या घटनेविषयी स्थानिक आमदार रामेश्‍वर शर्मा म्हणाले की, भाजपच्या राज्यात एवढे धाडस करणार्‍यांकडून एकेक दगडाचा हिशोब चुकता केला जाईल. जाळपोळ करणार्‍यांकडून हानीभरपाई वसूल केली जाईल.

दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्यात येईल ! – शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्यप्रदेश

दंगलीच्या घटनेवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बैठक बोलावली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, हिंसाचार सहन केला जाणार नाही. केवळ अटक करून कारागृहात टाकण्यात येणार नाही, तर सार्वजनिक आणि खासगी संपत्ती यांची हानी करणार्‍यांकडून त्याची भरपाई वसूल कली जाईल. दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

खरगोन येथे धर्मांधांची घरे बुलडोजरद्वारे पाडली !

 

खरगोन येथे मुसलमानबहुल भागात मिरवणुकीवर दगडफेक करणार्‍यांच्या घरांवर प्रशासनाने बुलडोजरद्वारे कारवाई करत ती पाडून टाकली. आतापर्यंत एकूण ७७ जणांना अटक करण्यात आली आहे.

भरतपूर (राजस्थान) येथे मशिदीसमोर लावण्यात आलेले स्पिकर पोलिसांनी बंद केले !

भरतपूर शहरात रामनवमीच्या दिवशी हिंदूंकडून काही ठिकाणी स्पिकर लावण्यात आले होते. जामा मशिदीसमोर स्पिकर वर भजने लावण्यात आली होती. त्यामुळे वाद झाल्याने पोलिसांकडून स्पिकर बंद करण्यात आले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *