हिंदु जनजागृती समितीची दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्यांकडे मागणी
मडगाव – मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाच्या आदेशावरून गोव्यातील अतिरिक्त जिल्हाधिकार्यांनी प्रशासनाची अनुज्ञप्ती घेतल्याविना मशिदींवर भोंगे न लावण्याचा आदेश यापूर्वी दिलेला आहे, तरीही गोव्यात सर्व मशिदींवर ‘अजान’साठी अनधिकृतपणे भोंग्यांचा वापर करण्यात येत आहे. शासनाने मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर, तसेच देशभरात रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या करणारी २ निरनिराळी निवेदने हिंदु जनजागृती समितीने दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्यांना त्यांची भेट घेऊन दिली आहेत. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये श्री. प्रसाद शिंकरे, श्री. सत्यविजय नाईक, श्री. सुधाकर आगलावे, अधिवक्ता संजय चोडणकर आणि श्री. महेश पै काणे यांचा समावेश होता.
मशिदींवरील अनधिकृत भोंग्यावरून देण्यात येत असलेल्या अजानमुळे ध्वनीप्रदूषण होत आहे आणि मशिदीवर अनधिकृत भोंगे लावण्याच्या कृतीला धार्मिक परंपरा असे म्हणता येणार नाही. असा प्रकार इतर धर्मियांकडूनही केला गेल्यास राज्यात मोठा बिकट प्रसंग निर्माण होऊ शकतो, असे मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भातील निवेदनात म्हटले आहे. दुसर्या निवेदनात म्हटले आहे की, १० एप्रिल या दिवशी देशभरात उत्साहात पार पडलेल्या श्रीरामनवमीच्या दिवशी गोव्यात वास्को शहरासह अनेक राज्यांत रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकांवर दगडफेक करण्यात आली. या वेळी घडलेल्या दगडफेकीसह तलवारी घेऊन हिंसक आक्रमण; वाहने आणि घरे पेटवणे; सार्वजनिक संपत्तीची हानी करणे आदी सर्व घटना गंभीर आहेत. श्रीरामनवमीच्या दिवशी झालेले आक्रमण हे एक सुनियोजित षडयंत्र असून एकाच वेळी इतक्या ठिकाणी हिंसक घटना कशा घडल्या ? यामागे कुणाचा हात आहे ? धार्मिक उत्सवांना लक्ष्य का केले जात आहे ? या सर्व घटनांची राष्ट्रीय स्तरावर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार्या निवेदनाची प्रत केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवण्यात आली आहे, तर मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारी प्रत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना पाठवण्यात आली आहे.
हिंदू रक्षा महाआघाडीचा समितीला पाठिंबामशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्याच्या हिंदु जनजागृती समितीच्या मागणीला हिंदू रक्षा महाआघाडीने पूर्ण पाठिंबा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील भोंगे हटवावेत, असे त्यांनी म्हटले आहे. |