Menu Close

‘मॅकडोनाल्ड’कडून भारतात हिंदूंवर ‘हलाल’ सक्ती का ? – हिंदु जनजागृती समिती

‘हलाल’ प्रमाणपत्र ही अनधिकृत प्रमाणीकरण व्यवस्था त्वरित बंद करण्याची मागणी !

डावीकडून अधिवक्ता खुश खंडेलवाल, बोलतांना श्री. सतीश कोचरेकर आणि वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे

मुंबई – धर्मनिरपेक्ष भारतात प्रत्येकाला त्याच्या धर्म आणि पंथ यांनुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र भारतातील बहुसंख्य हिंदूंना हे स्वातंत्र्य नाही. भारतात ८० टक्के बहुसंख्यांक हिंदु समाज असतांनाही त्यांना हलाल मांस खाण्याची सक्ती करणे, हे राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष तत्त्वाच्या विरोधात आणि हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची हानी करणारे नाही का ? असा परखड प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी उपस्थित केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १३ एप्रिल या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आणि ‘हिंदू टास्क फोर्स’चे संस्थापक अध्यक्ष खुश खंडेलवाल आणि सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) दीक्षा पेंडभाजे उपस्थित होत्या.

श्री. सतीश कोचरेकर पुढे म्हणाले, 

१. मुसलमान इस्लामी मान्यतेनुसार ‘हलाल’ मांसाचा आग्रह धरतात, तर मांसाहारी हिंदू आणि शीख यांच्यासाठी ‘झटका’ मांस खाण्यास मान्यता आहे.

२. असे असतांनाही भारतात व्यवसाय करणारी ‘मॅकडोनाल्ड’सारखी विदेशी आस्थापने मात्र केवळ ‘हलाल प्रमाणित’ मांसाहारी पदार्थ उपलब्ध करून देत आहेत. हा भारतातील बहुसंख्य हिंदूंचा अपमान नाही का ?

३. हलाल केवळ मांस किंवा खाद्यपदार्थ यांपुरते मर्यादित राहिले नसून, ती एक अर्थव्यवस्था बनली आहे. त्याच्या अंतर्गत सौंदर्यप्रसाधनांपासून ते रुग्णालयांपर्यंत हलाल प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे.

४. भारतातील आस्थापनांना इस्लामी देशांमध्ये त्यांची उत्पादने निर्यात करण्यासाठी ‘हलाल’ प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.

५. ‘हलाल’चा पैसा हा आतंकवाद्यांच्या न्यायालयीन साहाय्यासाठी वापरला जात असल्याचे उघड होत आहे.

६. यातून भविष्यात भारताची अर्थव्यवस्था, तसेच राष्ट्रीय सुरक्षा यांना धोका निर्माण होऊ शकतोे. त्यामुळे हिंदूंनी ‘हलाल प्रमाणपत्र’ असलेल्या वस्तूंवर बहिष्कार घालावा आणि सरकारने ‘हलाल’ प्रमाणपत्र ही अनधिकृत प्रमाणीकरण व्यवस्था त्वरित बंद करावी.

७. हलाल मांस निर्माण करणारी व्यक्ती अल्लावर श्रद्धा असणारी, म्हणजेच मुसलमान असणे आवश्यक आहे. त्यामुळे पूर्वापार व्यवसाय असलेला हिंदु धर्मातील खाटिक समाज यातून वगळला जात आहे. यामुळे खाटिक समाज बेरोजगार होण्याची भीती निर्माण झाली आहे.

हलाल प्रमाणपत्राविषयी पुरोगामी मंडळी मूग गिळून गप्प का ? – अधिवक्ता खुश खंडेलवाल

अधिवक्ता खुश खंडेलवाल

भारतातील काही आस्थापने सरसकट सर्व पदार्थांसाठी ‘हलाल’ प्रमाणपत्र देत बळजोरीने ते हिंदूंच्या माथी मारत आहेत. हे धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाच्या विरुद्ध आहे. ‘धर्मनिरपेक्षता’, ‘राज्यघटनेने दिलेला अधिकार’, ‘सर्वधर्मसमभाव’ असे शब्द सोयीनुसार वापरून हिंदूंवरील अन्यायाविषयी गप्प रहाणे, हे बेगडी पुरोगामित्व होय. हलाल प्रमाणपत्र असलेले उत्पादन विकत घेणे म्हणजे एकप्रकारे आतंकवादी कारवायांना सहयोग करण्यासारखे आहे.

अल्पसंख्यांकांनी बहुसंख्यांकांच्या धार्मिक मूल्यांचा आदर ठेवावा ! – वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे

वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे

बहुसंख्य असूनही हिंदूंनी कधीही अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणलेली नाही; मात्र हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदूंच्या सहिष्णुतेचा अपलाभ घेतला जात आहे. बहुसंख्य असणार्‍या समाजावर अल्पसंख्यांकांनी ‘हलाल मांस’ खाण्याची सक्ती करण्याला इंग्लंडमधील निकोलस तालेब यांनी ‘अल्पसंख्यांकांची हुकूमशाही’ (Minority Dictatorship) असे म्हटले आहे. त्यामुळे देशातील अल्पसंख्यांकांनी बहुसंख्यांक हिंदूंच्या धार्मिक मूल्यांचा आदर ठेवायला हवा.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *