१. सातारा येथे श्री काळाराम मंदिरात श्री. राहुल कोल्हापुरे यांनी साकडे घातले. या वेळी सनातन संस्थेचे साधक कॅप्टन विजयकुमार मोरे, अधुनिक वैद्य प्रकाश जोशी, सौ. संतोषी माने, वैद्या (सौ.) संध्या देशपांडे आणि श्रीरामभक्त उपस्थित होते. श्रीरामनवमीनिमित्त मंदिरात सनातननिर्मित ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या वेळी राष्ट्रपती पारितोषिक विजेते वेदशास्त्रसंपन्न श्रीकृष्णशास्त्री जोशी यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली आणि सनातनच्या कार्याला आशीर्वाद दिले. या वेळी ‘शिव’ हा ग्रंथ देऊन शास्त्रीजींचा सन्मान करण्यात आला.
२. कराड येथील शास्त्रीनगरस्थित श्रीदत्त मंदिर येथे साकडे घालण्यात आले. या वेळी २४ हून अधिक भाविक मंदिरात उपस्थित होते.
३. चाफळ येथील श्रीराममंदिरात सनातनच्या साधिका सौ. सुधा जाधव यांनी प्रभु श्रीरामाला साकडे घातले. तसेच या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेण्यात आली.
४. कराड तालुक्यातील दुधोडी धर्मशिक्षणवर्गाकडून ‘ऑनलाईन’ पद्धतीने रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी १२३ हून अधिक श्रीरामभक्तांनी उपस्थिती दर्शवली. या वेळी उपस्थितांना हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ देण्यात आली. तसेच उपस्थितांनी १५ मिनिटे नामजप केला.
५. खटाव तालुक्यातील खातवळ येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी साकडे घालण्यात आले. ३० हून अधिक भाविक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.