Menu Close

एम्.आय.एम्.चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांची निर्दोष मुक्तता

‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा’ या आक्षेपार्ह विधान केल्याचे प्रकरण

एम्.आय.एम्.चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी

भाग्यनगर (तेलंगाणा) – एम्.आय.एम्.चे आमदार आणि पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांना आक्षेपार्ह भाषण केल्याच्या प्रकरणी येथील विशेष सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.

डिसेंबर २०१२ मध्ये अकबरुद्दीन यांनी राज्यातील निजामाबाद आणि निर्मल येथील सभांमध्ये बोलतांना ‘तुम्ही १०० कोटी आहात आणि आम्ही २५ कोटी आहोत. १५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा मग कुणामध्ये किती धाडस आहे हे दाखवून देऊ’ असे विधान केले होते. या प्रकरणी २ ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात येऊन त्यांना अटकही करण्यात आली होती. नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले होते. आता त्यांना या प्रकरणी निर्दोष ठरवण्यात आले आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *