अधिवेशनाला सतगुरु महर्षि ॐ ह्यांची वंदनीय उपस्थिती
सोनीपत (हरियाणा) येथे हिंदु राष्ट्र अधिवेशन संपन्न झाले. अधिवेशनाचा प्रारंभ दीपप्रज्वलाने चैतन्यपूर्ण वातावरणात झाला , ह्यावेळी व्यासपीठावर विश्व हिंदू परिषदेचे अधिवक्ता मोहन कौशिक , पंडित श्याम सुंदर शर्मा आणि हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री नरेंद्र सुर्वे उपस्थित होते.
मेवात सारखी स्थिती पानिपत येथे निर्माण होत आहे – अधिवक्ता मोहन कौशिक, विश्व हिंदु परिषद
आज जी हिंदूंची स्थिती इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि काश्मीर मध्ये झाली तशीच स्थिति आज हरियाणा राज्यात मेवात येथे झाली आहे. आज मेवात मध्ये ५३४ पैकी २०० गावांमध्ये एकही हिंदु शिल्लक नाहीत. आज अशीच स्थिती आपल्या आजूबाजूला सोनीपत मध्ये निर्माण होत आहे म्हणून आपल्याला जागे झाले पाहिजे. आज मोठ्या प्रमाणात हिंदु युवती लव जिहादच्या षडयंत्राला बळी पडत आहेत, त्याबद्दल देखील हिंदु तरुणींमध्ये जागृती करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी केले.
जाती-पातीची सर्व बंधने बाजूला सारून हिंदू म्हणून संघटित व्हावे – सतगुरु महर्षि ॐ जी गन्नौर
सतगुरु महर्षि ॐ जी गन्नौर हे हरियाणा चे मूळ निवासी आहेत आणि फ्लोरिडा अमेरिकेत निवास करत असतात आणि लोकांमध्ये सनातन धर्माचा अध्यात्माचा प्रसार करतात. ते उपस्थित धर्मप्रेमींना संबोधित करताना म्हणाले कि, गुरु गोविंदसिंग यांनी धर्म आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वतःच्या मुलांचे बलिदान दिले , जे १० गुरु होऊन गेले त्यांनी देखील धर्माच्या रक्षणासाठी बलिदान दिले आणि जिहादी धर्म स्वीकारण्यास नकार दिला. एक सुनियोजित पद्धतीने हिंदूंचे धर्मांतरण केले जात आहे, हे रोखण्यासाठी आपण सर्वांनी जाती-पातीची सर्व बंधने बाजूला सारून हिंदू म्हणून संघटित होणे ही काळाची आवश्यकता आहे.
आज संपूर्ण देश अतीदक्षता विभागात आहे (ICU) अशी राष्ट्राची आणि सनातन हिंदु धर्माची स्थिती आहे , हिंदूंमध्ये उदासीनता आणि निराशा आहे, अशा समाजाला संघटीत करून जागृत करण्याची आज आवश्यकता आहे, असे मत श्री. रामकंवर मलिक यांनी व्यक्त केले.
पानिपत चे श्री देवेंद्र सिंग, पाथरी यांनी सांगितले, मंदिराचे सनातन धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. सर्व हिंदूंनी साप्ताह मध्ये एकदा तरी आपल्या बाजूच्या मंदिरात जावे, तेथे स्वच्छता करावी आणि सेवा करावी. जे हिंदु चुकीच्या पद्धतीने नैवेद्य अर्पण करून मंदिरात अस्वच्छता करतात त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करावी, सर्व मंदिरांनी प्रत्येक महिन्यात पौर्णिमेला हवन करावे त्या योगे वातावरणात शुद्धता निर्माण होईल.
वेगळ्या राष्ट्राची मागणी करून भारतात राहण्याची अनुमती दिल्याने आज देशात हिंदुंची दयनीय स्थिती झाली – श्री श्याम सुंदर शर्मा
मंदिर आमचे श्रद्धा आणि आराधना करण्याचे केंद्र आहेत. आपल्याला इथे गेल्यावर शांतीचा अनुभव होतो. मंदिरात जे पुरोहीत आहेत ते विद्वान आणि धर्मशिक्षा देऊ शकतील असे असायला हवेत. आपल्या धार्मिक ग्रंथात जे ज्ञान दिले आहे तर त्याबद्दल समाजाला मार्गदर्शन करणारे असावेत जेणे करून लोक प्रभावीत होऊन, कृती करून जीवनात आनंद प्राप्त करून घेतील. भारताची फाळणी पंथाच्या आधारावर झाली आणि स्वतःला राष्ट्रपिता म्हणून घेणाऱ्या नेत्याने ज्या मुस्लिमांनी वेगळ्या राष्ट्राची मागणी केली त्यांना भारतात राहण्याची अनुमती दिली त्याचा परिणाम आणि समस्या आज आपण सर्व हिंदू पाहत आहोत, असे वक्तव्य श्री श्याम सुंदर शर्मा यांनी केले.
अधिवक्ता संतराम सिंह (विश्व हिंदू परिषद) : सोनीपत मध्ये जी टी रोड वर एक पुलाचे निर्माण कार्य सुरु असताना तेथे एक प्राचीन हनुमान मंदिर आहे आणि तो तोडण्याचा निर्णय हायवे औथोरीटी ने घेतला, हायवे औथोरीटी सोबत आम्ही बैठका घेतल्या पण ते ऐकण्यास तयार नव्हते , आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नाने आणि हिंदुच्या एकजूटी मुळे आम्ही हे मंदिर वाचवू शकलो.
हिंदु व्यापार्यांनी हलाल प्रमाणित वस्तूंवर बहिष्कार घालावा – श्री नरेंद्र सुर्वे, समन्वयक, हिन्दू जनजागृति समिति
नरेंद्र सुर्वे यांनी हलाल अर्थव्यवस्था आणि संकट हा विषय सांगताना, हलाल म्हणजे काय आणि हलाल प्रमाणपत्र कशा पद्धतीने विकले जात आहेत आणि कोण कोणती आस्थापने आणि वस्तू हलाल प्रमाणित आहेत, जमलेल्या पैशाचा वापर जमियत उलेमा ए हिंद हलाल ट्रस्ट आतंकवाद्यांना विधी सहायता करत आहे, हे हिंदूंसाठी अतिशय धोकादायक आहे आणि म्हणून हिंदु समाजाने, हिंदु व्यापार्यांनी हलाल प्रमाणित वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची आवश्यकता आहे. अनेकांनी या विषयाबद्दल कार्यक्रमनंतर अधिक माहिती घेतली आणि स्थानिक व्यापारी यांच्यासाठी बैठक आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.
हिंदू आणि हिंदुत्व हे वेगळे आहे, अशी धारणा मांडून हिंदूंना अतिरेकी ठरवण्याचा प्रयत्न होत आहे – सद्गुरू डॉ चारुदत पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शन, हिन्दू जनजागृति समिति
हिंदु राष्ट्र अधिवेशन हा एक यज्ञ आहे आणि हिंदुत्वनिष्ठांच्या विचारांनी हा धगधगत आहे. आज स्वार्थी आणि अहंकारी राजकीय नेते आणि पक्ष सत्ता प्राप्तीसाठी गठबंधन करतात आणि एकत्र येतात तर मग जे निस्वार्थ भावाने हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्या हिंदुनी आणि हिंदू संघटनांनी संघटीत होऊन एकत्र आल्यास हिंदु राष्ट्र नक्कीच स्थापन करू शकतो, असा मला विश्वास आहे. सद्या हिंदू आणि हिंदुत्व हे दोन्ही वेगवेगळे आहे, अशी धारणा मांडून हिंदूंना अतिरेकी ठरवण्याचा प्रयत्न सुरु आहे आणि त्यासाठी भारताबाहेर परिषदा घेतल्या जात आहेत. भारतीय लोकशाही व्यवस्था हि जगातील सर्वात यशस्वी लोकशाही असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात ज्या पद्धतीने हिंदूंना या देशात वागणूक दिली जाते ते पाहता हि लोकशाही जगातील अयशस्वी लोकशाही आहे असे म्हणता येईल. आज च्या अधिवेशनाने उपस्थित सर्व हिंदू बंधू , हिंदू संघटना ह्यांच्या मनात जी संघटनेची ज्योत निर्माण झाली आहे ती येणाऱ्या काळात मशाल बनून हिंदु राष्ट्र स्थापन करेल, असा मला विश्वास वाटतो.
अधिवेशनाला सोनीपत येथील विश्व हिंदू परिषदेचे व अन्य हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकरते , श्रीराम सेनेचे श्री सुरेश चावला, श्री श्यामसुंदर जी , गौरक्षक ,नव दुर्गा मंदिराचे ट्रस्टी आणि व्यवस्थापक , समितीच्या संकेतस्थळा च्या मार्गे जोडलेले ३९ हिंदुत्ववादी आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.