धार्मिक सलोख्याचा संदेश दिल्याचा मंदिराच्या अध्यक्षाचा दावा
‘हिंदु-मुसलमान एकता’ हे मृगजळासमान असल्याचा इतिहास असतांना मंदिराचे अध्यक्ष कोणत्या जगात वावरत आहेत ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
धार्मिक सलोख्याचा ठेका केवळ हिंदूंनी घेतलेला नाही, हे या अध्यक्ष महाशयांना कोण सांगेल ? आताच होऊन गेलेल्या रामनवमीला देशातील किमान ८ राज्यांमध्ये हिंदूंच्या शोभायात्रांवर धर्मांधांकडून आक्रमणे करण्यात आली. ‘हे धर्मांध धार्मिक सलोखा का राखत नाहीत ?’, याचे उत्तर मंदिराचे अध्यक्ष देतील का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
नवी देहली – केरळमधील एका मंदिराने शहरातील मुसलमानांसाठी इफ्तार मेजवानीचे आयोजन केले, असे वृत्त ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. मलप्पुरम जिल्ह्यातील तिरूरजवळ वानियान्नूर येथे हे मंदिर आहे. मंदिराचे अध्यक्ष वेलयुधन् आणि खजिनदार लक्ष्मणन् यांनी सांगितले की, मंदिराच्या हद्दीमध्ये या मेजवानीचे आयोजन केल्याने आज आवश्यक असलेल्या धार्मिक सलोख्याचा स्पष्ट संदेश सर्वत्र दिला गेला आहे.