ढाका (बांगलादेश) – येथील एका स्थानिक न्यायालयाने ढाका विश्वविद्यालयातील प्रसिद्ध लेखक आणि साहित्यकार प्रा. हुमायू आझाद यांच्या हत्येच्या १८ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात ४ जिहादी आतंकवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. सर्व दोषी बंदी लादण्यात आलेल्या ‘जमात-उल्-मुजाहिदीन बांगलादेश’ (जे.एम्.बी.) या जिहादी संघटनेचे सदस्य होते. प्रा. हुमायू आझाद यांची फेब्रुवारी २००४ मध्ये ढाका विश्वविद्यालयाच्या परिसरात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती.
कट्टरतावादी विचार प्रसारित करणारी जे.एम्.बी. आणि अन्य आतंकवादी संघटना यांचा प्रा. आझाद लेखनाद्वारे विरोध करत असत. आक्रमणाच्या काही दिवसांआधी त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या वेळी पाकिस्तानी अधिकार्यांच्या भूमिकेवर टीका करण्यात आली होती.