Menu Close

कन्याकुमारी येथे शाळकरी मुलांच्या धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न करणारी ख्रिस्ती शिक्षिका निलंबित

सरकारकडून चौकशीचा आदेश

द्रमुकच्या राज्यात हे काय चालले आहे ? सरकार हिंदुविरोधी आणि ख्रिस्तीधार्जिणी नीती अवलंबत असल्यामुळे धर्मांध ख्रिस्त्यांचा उद्दामपणा वाढला आहे. हे रोखण्यासाठी तमिळनाडूमध्ये परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !

कन्याकुमारी (तमिळनाडू) – येथील कन्नटू विलाई या सरकारी उच्च माध्यमिक शाळेत हिंदूंच्या देवतांची अपकीर्ती करणे आणि हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न करणे या प्रकरणी इयत्ता ६ वीत शिकणार्‍या मुलीच्या पालकांनी शिक्षिकेच्या विरोधात मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. या घटनेची चौकशी करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. ‘या चौकशीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल; मात्र तोपर्यंत शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे’, असे तमिळनाडूचे शालेय शिक्षणमंत्री अनबिल महेश यांनी म्हटले आहे. विद्यार्थिनीचे वडील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत.

१. ‘या शाळेतील बीट्राईस थंगम या शिक्षिका मुलांना शिवणकाम शिकवतात. त्या वर्गामध्ये सातत्याने ख्रिस्ती धर्माची महिमा गात असतात आणि हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह टीपणी करत असतात’, असे विद्यार्थिनीने तिच्या पालकांना सांगितले होते. यानंतर पालकांनी एका हिंदु संघटनेच्या सदस्यांसह शाळेच्या मुख्यध्यापकांना घडलेला प्रकार सांगितला.

२. शाळेत कोणती अनुचित घटना होऊ नये, यासाठी पोलिसांना बोलावण्यात आले होते. या प्रकरणात पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही.

३. विद्यार्थिनीच्या पालकांचे म्हणणे आहे की, आम्हाला पोलीस तक्रार करायची नाही; मात्र शालेय शिक्षण विभागाने शिक्षिकेवर योग्य ती कारवाई करावी.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *