तमिळनाडू सरकारचा हिंदुद्रोही निर्णय !
स्थानिक लोकांचा विरोध
तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) पक्षाचे सरकार असल्याने तेथे अशा घटना घडल्यास आश्चर्य ते काय ? असे सरकार कधी चर्च आणि मशीद यांचे सरकारीकरण करण्याचे धाडस करत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडू सरकारच्या धर्मादाय विभागाने चेन्नईमधील पश्चिम मांबलम् येथील ‘अयोध्या मंडपम्’ला स्वतःच्या नियंत्रणात घेतले आहे. ६४ वर्षीय जुने असलेल्या या धार्मिक स्थळाला ‘अयोध्या अश्वमेध महा मंडपम्’ असेही म्हटले जाते. स्थानिक नागरिकांनी या धार्मिक स्थळाचे सरकारीकरण करण्याचा विरोध केला. यासाठी त्यांनी आंदोलन केले. काही राजकीय पक्षांनी नागरिकांच्या आंदोलनाला समर्थनही दिले. या वेळी पोलिसांनी काही जणांना कह्यात घेतले. या आंदोलनात भाजपच्या स्थानिक नगरसेविका उषा आनंदन् या सहभागी झाल्या होत्या. ‘अयोध्या मंडपम्’चे दायित्व ‘श्रीराम समाज’ यांच्या हातात होते.
‘Ayodhya Mandapam’ row … State takes over control
CM cites ‘mismanagement’. ‘Not a temple, can’t usurp’, BJP protests ‘illegal move’.
‘Overreach’ by state sarkar?#IndiaUpfront with @RShivshankar pic.twitter.com/4FxzA4zxzF
— TIMES NOW (@TimesNow) April 13, 2022
१. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, हे धार्मिक स्थळ जनतेच्या अर्पणातून बांधण्यात आलेले आहे. येथे प्रतिदिन धार्मिक कार्यक्रम होतात; मात्र हे मंदिर नाही. येथे मोठ्या प्रमाणात भाविकांकडून अर्पण केले जात असल्याने सरकारने याचे सरकारीकरण केल्याचा लोकांचा आरोप आहे.
२. तमिळनाडू सरकारचे म्हणणे आहे की, येथे अर्पण केले जात असल्याने ते मंदिर आहे. ‘श्रीराम समाजा’चे म्हणणे आहे की, येथे केवळ देवतांच्या चित्रांची पूजा केली जाते. येथे कोणत्याही मूर्ती नाहीत.
३. धर्मादाय विभागाचे म्हणणे आहे की, या धार्मिक स्थळाच्या व्यवस्थापनाच्या विरोधात तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्याचे सरकारीकरण करण्यात आले. (वक्फ बोर्डामध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी आहे; मग हे बोर्ड सरकार कह्यात का घेत नाही ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)