Menu Close

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात मनसेचे पहिले हनुमान चालिसा पठण !

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त १६ एप्रिल या दिवशी कुमठेकर रस्त्यावर खालकर तालीम चौकातील हनुमान मंदिरात सायंकाळी ६ वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात महाआरती आणि सामूहिक हनुमान चालिसा पठण आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी दिली. येत्या ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली न उतरवल्यास मशिदींसमोरच हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, अशी चेतावणी राज ठाकरे यांनी सरकारला दिली होती. त्यानंतर पुण्यात पहिलाच हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांचा उल्लेख ‘हिंदु जननायक’ असा करण्यात आला आहे.

अजय शिंदे यांनी सांगितले की, गेले दीड शतक खालकर मारुति मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान राहिले आहे. हे मंदिर जुने झाल्यामुळे आणि एका अपघातात मंदिराची भिंत पडल्यानंतर २० वर्षांपूर्वी मंदिराच्या बांधकामाचा प्रारंभ राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला होता.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *