Menu Close

हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेणार्‍या धर्मांधाची घरे नागरिकांनी जाळली !

पोलीस धर्मांधांच्या विरोधात कठोर कारवाई करत नसल्याने नागरिक कायदा हातात घेत असतील, तर त्याचा विचार करणे आवश्यक ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

घटनास्थळ

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील रुनकता भागात लव्ह जिहादच्या प्रकणातील आरोपी साजिद याला अटक न झाल्याने संतप्त नागरिकांनी त्याची २ घरे जाळली. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे, तर या घटनेत निष्काळजीपणा केल्यामुळे एका पोलीस अधिकार्‍याला निलंबित करण्यात आले आहे.

आरोपी साजिद एका व्यायामशाळेचा संचालक आहे. त्याने एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला घेऊन पलायन केले होते. या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतरही त्याला पोलिसांनी अटक न केल्याने संतप्त लोकांनी त्याची घरे जाळली. पोलिसांनी पळवून नेलेल्या तरुणीला देहलीतून कह्यात घेतले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *