अमरावती – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने रामनवमीपासून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये प्रवचने घेणे, सामूहिक नामजप करणे, हिंदु राष्ट्रासाठी देवतांना साकडे घालणे, मंदिर स्वच्छता करणे याचा समावेश आहे. या अंतर्गत अमरावतीतील पट्टाभि श्रीराम मंदिर, कुंभार वाडा; श्री गजानन महाराज मंदिर, गोविंद शांती विहार; मारुति मंदिर, महावीरनगर; राममंदिर, अमर नगर; श्रीराम मंदिर, सौरभ कॉलनी; विठ्ठल रुक्मिणी मंदिर, प्रवीण नगर; श्री भवानीदेवी मंदिर, न्यू काँग्रेस नगर; श्रीराम मंदिर, छांगाणी नगर; काळा हनुमान मंदिर, विजय नगर; साई नगर गणेश मंदिर, वडनेरकर वाडी; हनुमान मंदिर, धनराज नगर; पांढरी हनुमान मंदिर, महिंद्र कॉलनी या मंदिरांमध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साकडे घालण्यात आले. स्थानिक नागरिक आणि धर्मप्रेमी हिंदू यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. काही ठिकाणच्या मंदिरांत सामूहिक नामजप, तसेच रामरक्षा पठण यांचे आयोजन करण्यात आले होते. पांढरी श्री हनुमान मंदिराची सनातनच्या साधकांनी स्वच्छता केली.