तत्पूर्वी पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्याचीही हत्या
केरळमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच योग्य !
पलक्कड (केरळ) – येथे १६ एप्रिल या दिवशी श्रीनिवासन (वय ४५ वर्षे) या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची अज्ञातांनी हत्या केली. ते त्यांच्या दुकानात बसले असतांना त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले.
केरल के पलक्कड़ में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के कार्यकर्ता श्री श्रीनिवासन की पीएफआई द्वारा निर्मम हत्या।हुतात्मा को भावभीनी श्रद्धांजलि। pic.twitter.com/iUiZAFxYGY
— Anurag Mishra (@bjpanuragabvp) April 16, 2022
या घटनेच्या काही घंट्यांपूर्वी येथील एका गावात पॉप्युुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या सुबैर (वय ४३ वर्षे) नावाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. तो नमाजपठण करून घरी परतत असतांना त्याच्यावर अज्ञातांकडून आक्रमण करण्यात आले. श्रीनिवासन यांच्या हत्येमागे पॉप्युुलर फ्रंट ऑफ इंडियाची राजकीय शाखा असणार्या ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चा हात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.