मेरठ (उत्तरप्रदेश) – गायीमुळे आपल्याला दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र, असे ५ पदार्थ मिळतात. गायीच्या शेणात लक्ष्मी, तर गोमूत्रात गंगामैया वास करते. गोमूत्र शिंपडल्यास भूतबाधा किंवा वास्तुदोष यांसारख्या समस्या दूर होतात, असे विधान उत्तरप्रदेशचे पशुसंवर्धन आणि दूग्धविकास मंत्री धरमपाल सिंह यांनी केलेे. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पशुधन मंत्री धर्मपाल सिंह बोले- ‘गौमूत्र में होता है गंगाजल दूर होती हैं बाधाएं, गोबर में होती हैं लक्ष्मी’@tiwariavinash की रिपोर्ट #DharmpalSingh #BJP #UttarPradeshhttps://t.co/YmgrnzC7T4
— ABP Ganga (@AbpGanga) April 15, 2022
धरमपाल सिंह पुढे म्हणाले की, राज्यभरात रस्त्यांवर फिरणार्या प्राण्यांसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक गावात ‘चारा बँक’ स्थापन करण्याची योजना आहे. गायीचे शेण विकून सी.एन्.जी. इंधनाचे उत्पादन करण्याची योजना आहे. याद्वारे पैसाही मिळेल. दूध देणार्या गायींचे पालनपोषण तर केले जातेच; पण या योजनेमुळे दूध न देणार्या गायींचेही पालनपोषण केले जाईल.