-
हिंदुत्ववाद्यांची निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षकांकडे मागणी
-
प्रथम निवेदन देऊनही कार्यवाही न झाल्याने दुसर्यांदा निवेदन दिले
कोल्हापूर : श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय त्वरित हटवण्याच्या संदर्भात तक्रार देऊनही कृती न केल्याविषयी येथील अप्पर पोलीस निरीक्षक एस्. चैतन्य यांना श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांनी लक्ष घालून या संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा सर्व हिंदुत्ववादी आणि भाविक यांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास याचे सर्वस्वी दायित्व प्रशासनाचे राहील, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे, श्री. चंद्रकांत बराले, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील शौचालय बंद करून ते कुंड भाविकांसाठी तात्काळ खुले करावे, या मागणीची तक्रार हिंदुत्ववाद्यांच्या वतीने कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ९ मार्च २०१६ या दिवशी करण्यात आली होती. या संदर्भात १ मास उलटूनही त्यावर कृती करण्यात आलेली नाही. तरी या गोष्टीची तात्काळ नोंद घेऊन वरील निवेदन दिले गेले. (हिंदूंनो, वारंवार निवेदने द्यावी लागू नयेत, यासाठीच हिंदु राष्ट्र स्थापा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
याची प्रत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, श्री. विनोद तावडे सांस्कृतिक तथा पुरातत्व खाते, गृहराज्यमंत्री श्री. राम शिंदे, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनाही सादर करण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात