श्रीरामनवमीनिमित्त वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भव्य ‘हिंदू एकता शोभायात्रे’चे आयोजन
पातालपुरी मठ पीठाधिश्वर महंत बालक दासमहाराज यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. त्यानंतर मैदागीन चौक येथून शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला आणि तिचा समारोप दशावश्मेध चितरंजन पार्कमध्ये करण्यात आला. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
शोभायात्रेत सहभागी झालेले मान्यवर आणि हिंदुत्वनिष्ठ
अधिवक्ता अरुणकुमार मौर्या, अधिवक्ता संजीवन यादव, श्री. जयशंकर प्रसाद गुप्ता, डॉ. अजयकुमार जायसवाल, श्री. मुकेश श्रीवास्तव, डॉ. स्वतंत्र तिवारी, डॉ. सुधीर गुप्ता, श्री. राजन केशरी, श्रीमती सोनी सिंह
शोभायात्रेत सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटना
भारत विकास परिषद, मंगल करण कीर्तन मंडल, ॐ भारतीय ॐ, अखिल भारतीय मानस प्रचार समिती, संस्कृती रक्षा मंच, राष्ट्रीय मानवाधिकार आणि न्याय परिषद, रुद्रशक्ती सेना, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था
शोभायात्रेसाठी हिंदुत्वनिष्ठांनी केलेले साहाय्य
शोभायात्रेच्या वेळी डॉ. सुधीर गुप्ता आणि डॉ. स्वतंत्र तिवारी यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. तसेच डॉ. अजयकुमार जयसवाल यांनी पिण्याच्या पाण्याच्या २०० बाटल्यांची व्यवस्था केली. यासमवेतच त्यांनी २० ध्वज, रामनामाचे उपरणे आणि परिवहनाची व्यवस्था केली.
वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय१. श्री. जयप्रकाश सिंह आणि रुद्रशक्ती सेनेच्या श्रीमती सोनी सिंह म्हणाल्या की, आम्ही अनेक शोभायात्रा पाहिल्या आहेत; परंतु ही शोभायात्रा पाहून खरोखरंच ‘प्रभु श्रीरामाची शोभायात्रा निघाली आहे’, असे वाटत होते. २. ‘संस्कृती रक्षा मंचा’चे संयोजक श्री. रवि श्रीवास्तव यांनी शोभायात्रेचा मुख्य ध्वज धरला होता. त्यांनी सांगितले की, शोभायात्रेच्या वेळी त्यांचा कधीच हात दुखला नाही, तसेच थकवाही जाणवला नाही. उलट उत्साह वाढत केला. |
क्षणचित्र
१. ध्वजपूजनाच्या वेळी वापरण्यात आलेल्या श्रीफळावर तीन चिरे पडले. पूजनापूर्वी त्यावर एकही चीर नव्हती.
२. ‘आम्हाला या शोभायात्रेत सहभागी होता आले, हे आमचे सौभाग्य आहे’, असे उद्गार बिहारच्या चंपारण जिल्ह्यातून आलेले आणि शोभायात्रेत सहभागी झालेल्या २ तीर्थयात्रेकरूंनी काढले.
३. व्यापारी मंडळाच्या दोघा जणांनी शोभायात्रेवर पुष्पवर्षाव केला.
४. पुष्कळ उष्णता जाणवत असतांनाही संपूर्ण शोभायात्रेमध्ये धर्मप्रेमींना थकवा जाणवला नाही.
५. या शोभायात्रेत अनेक लोक उत्साहाने सहभागी झाले, तसेच शोभायात्रेच्या मार्गात जवळपासचे लोक जयघोष आणि नामजप करत होते.
६. काही लोक वाहनावर लावलेल्या प्रभु श्रीरामाच्या फलकाला हात लावून भावपूर्ण नमस्कार करत होते.
७. एका वेदपाठशाळेतील विद्यार्थी शोभायात्रा पाहून स्वत:हून शोभायात्रेत सहभागी झाले.
८. या शोभायात्रेत २ धर्मप्रेमी १५० किलोमीटरचा प्रवास करून सहभागी झाले होते.
९. संपूर्ण शोभायात्रेत सर्वांच्या हातात असलेले भगवे ध्वज उन्हामुळे चमकत होते आणि तेजस्वी दिसत होते.