धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
आग्रा (उत्तरप्रदेश) येथे झालेल्या ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे मान्यवरांनी केलेले कौतुक१. हिंदु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले, तर आपल्याला निश्चितपणे हिंदु राष्ट्राची स्थापना करणे शक्य आहे, असे ‘भारत स्वाभिमान ट्रस्ट’चे आग्रा मंडल प्रभारी देवेंद्र सिंह ढाकरे म्हणाले. २. ‘आज समिती ज्याप्रमाणे सर्वस्वाचा त्याग करून कार्य करत आहे, त्याप्रमाणे कार्य करण्याची आवश्यकता आहे’, असे डॉ. राजकुमार गुप्ता म्हणाले. |
आग्रा (उत्तरप्रदेश) – हिंदु राष्ट्राची स्थापना हा यज्ञ आहे. आपली भाषा, प्रांत, समस्या भिन्न असू शकतात; परंतु हिंदु राष्ट्र स्थापनेच्या सूत्रावर सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. आम्ही सनातन हिंदु परंपरेचे पुत्र आहोत. त्यामुळे आम्ही संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करू शकतो. देशविरोधी शक्तींना भारत इस्लाममय करायचा आहे. आज हिंदूंच्या ज्या समस्या आहेत, त्या आपण संघटित शक्तीनेच सोडवू शकतो. त्यामुळे सनातन धर्म वटवृक्षाच्या फांद्या अनेक असल्या, तरी आपण एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील राजेंद्रनगर स्थित स्वामी शरणम् अयप्पा मंदिराच्या सभागृहात ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला संबोधित करतांना ते मार्गदर्शन करत होते. आग्रा येथील धर्मप्रेमी श्री. शुभम् वर्मा आणि श्री. विनीत यादव यांनी अधिवेशनाचे सूत्रसंचालन केले. या अधिवेशनाला हिंदुत्वनिष्ठ, जिज्ञासू तथा समितीच्या संकेतस्थळाचे वाचक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अधिवेशनाला उपस्थित मान्यवर
भारत स्वाभिमान ट्रस्टचे आग्रा मंडल प्रभारी श्री. देवेंद्र सिंह ढाकरे, ‘आग्रा मेडिसिटी क्लिनिक’चे डॉ. राजकुमार गुप्ता, ‘हिंदु युवा वाहिनी’चे राज्यमंत्री श्री. पियूष शरण, धर्मप्रेमी डॉ. देवाशीष भट्टाचार्य आणि राष्ट्रप्रेमी पत्रकार श्री. पराग सिंघल