नाशिक येथे मशिदीच्या १०० मीटर परिसरात आणि अजानच्या वेळी हनुमान चालिसा लावण्यास बंदी !
Share On :
पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचे आदेश !
हिंदूबहुल महाराष्ट्रात केवळ हिंदूंसाठीच आदेश लावणे दुर्दैवी ! हिंदूंचे सण-उत्सव किंवा मिरवणुका अशा वेळी अन्य धर्मियांना अशा प्रकारे आदेश देण्याचे पोलिसांचे धाडस होईल का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
हनुमान चालिसा लावण्यास बंदी घालण्याऐवजी मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर पोलिसांनी कारवाई केली असती, तर हिंदूंवर हनुमान चालिसा म्हणण्याची वेळच आली नसती; मात्र धर्मांधांसमोर नांगी टाकणे आणि हिंदूंवर मर्दुमकी गाजवणे पोलिसांना जमत असल्यामुळे ते असले आदेश देत आहेत ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
नाशिक – येथील शहरामध्ये कुठल्याही मशिदीच्या १०० मीटर परिसरात आणि अजानच्या वेळी हनुमान चालिसा लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी भोंग्यांविषयी आदेश जारी केला आहे. आदेशानुसार सर्व धार्मिक स्थळांना भोंगे लावण्यासाठी अनुमती घेणे बंधनकारक असणार आहे. धार्मिक स्थळांनी ३ मेपर्यंत भोंग्यांसाठी अनुमती घ्यावी, असे आदेश नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत. ‘अनुमती न घेतलेल्या संबंधित अनधिकृत भोंग्यांवर कारवाई केली जाईल, तसेच मशिदीत अजान होण्याच्या १५ मिनिटे आधी हनुमान चालिसा लावता येईल’, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणत्याही धर्माच्या दैनंदिन कार्यक्रमांना भोंग्यांची आवश्यकता नसल्याने त्यांवर बंदीच पाहिजे ! – महंत श्रीमंडलाचार्य पीठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज