Menu Close

(म्हणे) ‘अंगावर आलात, तर सोडणार नाही !’ – धर्मांध एस्.डी.पी.आय. संघटनेचे अजहर तांबोळी यांची धमकी

मशिदीवरील भोंगे काढण्याविषयी राज ठाकरे यांनी आवाहन केल्याचे प्रकरण

उजवीकडे एस्.डी.पी.आय. संघटनेचे अजहर तांबोळी

पुणे – राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याचे आवाहन केले आहे. मुसलमान समाजाला वेठीस धरून राजकारण करू नका. सगळे निर्बंध मुसलमान समाजावर का ? (‘हिंदूंना कायदे आणि अल्पसंख्यांकांना फायदे’ अशी आजची परिस्थिती असतांना अल्पसंख्यांकांवर अन्याय होत असल्याचे वारंवार खोटे सांगणारे धर्मांध ! रामनवमी आणि हनुमान जयंती यांच्या शोभायात्रांवर देशातील अनेक राज्यांमध्ये धर्मांधांकडून आक्रमणे होणे, त्यामध्ये हिंदू घायाळ होणे, हिंदूंच्या दुकानांना आग लावणे हे कुणावर अन्याय होण्याची उदाहरणे आहेत ? – संपादक दैनिक सनातन प्रभात) आम्ही घटनात्मक मार्गाने उत्तर देऊ; पण अंगावर आलात तर सोडणार नाही, असे चिथावणीखोर आवाहन धर्मांध एस्.डी.पी.आय. (सोशल डेम्रॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) संघटनेचे सचिव अजहर तांबोळी यांनी केले आहे. पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (एस्.डी.पी.आय. संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या केल्याचे, तसेच आतंकवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप आहेत. कर्नाटकचे मंत्री के.एस्. ईश्‍वरप्पा यांनीही एस्.डी.पी.आय.  ही संघटना देशद्रोही असल्याचे म्हटले आहे. अशा संघटनेने घटनात्मक मार्गाने उत्तर देऊ’ असे म्हणणे विनोद आहे ! हिंदुत्वाचा पोटशूळ असलेल्या पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय. या देशद्रोही संघटनांवर तात्काळ बंदी घालावी, अशी समस्त हिंदूंची मागणी आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) राज ठाकरे हे सामाजिक प्रश्‍नांवर न बोलता भोंग्यांविषयी बोलले, तर आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू, असे एस्.डी.पी.आय. संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *