Menu Close

वडोदरा (गुजरात) येथे क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून हिंसाचार

मंदिरावर आक्रमण करून साईबाबांच्या मूर्तीची तोडफोड

गुजरातमध्ये भाजपचे राज्य असतांना धर्मांधांकडून सातत्याने हिंदूंवर आक्रमण करण्यासे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

घटनास्थळ

वडोदरा (गुजरात) – येथील रावपुरा भागात दोन दुचाकींच्या अपघातानंतर धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. यात एका मंदिराची तोडफोड करण्यात आली. तसेच साईबाबांची मूर्ती फोडण्यात आली. १० हून अधिक वाहनेही तोडण्यात आली. हिंसाचारामध्ये ४ जण घायाळ झाले आहेत.

पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. वडोदराचे पोलीस आयुक्त शमहर सिंह यांनी ‘लोकांनी अफवांवर विश्‍वास ठेऊ नये’, असे आवाहन केले आहे. राज्यातील आणंद जिल्ह्यामध्ये श्रीरामनवमीच्या दिवशी धर्मांधांनी मिरवणुकीवर आक्रमण करून हिंसाचार केला होता. यात एका हिंदूचा मृत्यू झाला होता.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *