वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये हिंदूंच्या सामूहिकपणे हत्या करण्यात आल्या, त्याला ‘नरसंहार’ म्हणून सरकारने स्वीकारावे; या नरसंहाराला उत्तरदायी असलेल्या सर्व दोषींना कठोर शिक्षा द्यावी; या नरसंहारात पीडित हिंदूंच्या जमिनी आणि संपत्ती तेथील धर्मांधांनी बळकावल्या, त्या हिंदूंना परत देण्यात याव्यात अन् विस्थापित हिंदूंना काश्मीरमध्ये पुन्हा रहाण्यासाठी विशिष्ट जागा देण्यात यावी, अशा आमच्या केंद्र सरकारकडे मागण्या आहेत. आम्ही काश्मिरी हिंदू झुकणार नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढतच राहू.
पीडित काश्मिरी हिंदूंच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढतच राहू ! – सुशील पंडित, संस्थापक, ‘रुट्स इन काश्मीर’
Tags : काश्मीरी पंडित