मुंबई – मुंबईतील ७२ टक्के मशिदींवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्यात आला असल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे. मनसेने मशिदींवरील भोंगे काढण्याचा दिलेल्या चेतावणीनंतर मुंबई पोलिसांकडून मुंबईतील मशिदींवरील भोग्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये काही मशिदींवरील भोंगे काढण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी पोलिसांकडून विविध संघटनेच्या नेत्यांशी संवाद साधण्यात येत आहे.