Menu Close

आसाममध्ये कोठडीतून पळालेले २ धर्मांध गोतस्कर चकमकीत ठार

गोतस्करांची उत्तरप्रदेशमध्ये होती ३०० कोटी रुपयांची संपत्ती !

प्रातिनिधिक छायाचित्र

गौहत्ती (आसाम) – आसाम पोलिसांनी दोघा गोतस्कर भावांना चकमकीत ठार केले आहे. या वेळी ४ पोलीस घायाळ झाले. अकबर बंजारा आणि सलमान अशी या गोतस्करांची नावे आहेत. हे दोघे उत्तरप्रदेशातील मेरठ येथील रहिवासी होते. १३ एप्रिलला दोघांना उत्तरप्रदेशमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर आसाम पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले. १४ एप्रिलला त्यांना आसामच्या कोकराझारमध्ये आणण्यात आले. दोन्ही गोतस्करांना न्यायालयाने ७ दिवसांची कोठडी सुनावली. १९ एप्रिलला हे दोघेही आरोपी पोलीस कोठडीतून पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवली. त्या वेळी कोकराझार येथे त्यांच्यात चकमक झाली आणि त्यात ते मारले गेले. यातील अकबर बंजारा याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस होते.

अकबर याने तस्करीचा विस्तार आसाम, मेघालय, बंगाल आणि मिझोरमपर्यंत केला होता. (एवढे होईपर्यंत पोलीस झोपले होते का ? – संपादक  दैनिक सनातन प्रभात) बंद ट्रकमधून बांगलादेशच्या सीमेपर्यंत गोवंश नेण्यात यायचे. अकबर आणि सलमान यांनी गोमांस तस्करीतून मेरठ, बिजनोर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ३०० कोटी रुपयांची संपत्ती विकत घेतली होती. अकबर बंजाराची उत्तरप्रदेशातील फलावदा परिसरात दहशत होती. त्यांच्या गुंडगिरीमुळे अनेक जण त्रासले होते. योगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यानंतरही अकबरचा गोमांस तस्करीचा व्यवसाय चालूच होता. अकबरला नेमके कुणाचे संरक्षण होते ?, याची चौकशी चालू आहे. अकबरच्या संपत्तीची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी आयकर विभागाला पत्र लिहिले होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *