‘मम भार्या समर्पयामि’ असा हिंदु धर्मग्रंथात अस्तित्वात नसलेला खोटा संदर्भ देऊन कन्यादान विधीवर टीका ! April 22, 2022 Share On : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून हिंदु धर्माची अपकीर्ती ! राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरीसांगली – कन्यादानाच्या वेळी ‘मम भार्या समर्पयामि ।’ (माझी पत्नी अर्पण करतो) असा मंत्र पुरोहित म्हणायला सांगतात, असा हिंदु धर्मात अस्तित्वात नसलेला खोटा संदर्भ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदु धर्म आणि पुरोहित यांची अपकीर्ती केली. या वेळी ‘अन्नदान ऐकले, नेत्रदान ऐकले, ‘कन्या’ ही दान करायची गोष्ट आहे का ?, असे म्हणून हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ या श्रेष्ठ विधीला चुकीचा ठरवण्याचा अश्लाघ्य प्रकारही अमोल मिटकरी यांनी केला. (अस्तित्वात नसलेला संदर्भ देऊन जाणीवपूर्वक हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याचे हे षड्यंत्र आहे. यातून मिटकरी यांचा हिंदुद्वेष आणि ब्राह्मणद्वेष दिसून येतो ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) ईश्वरपूर (सांगली) येथे १९ एप्रिल या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसची सार्वजनिक सभा झाली. या सभेत भाषण करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदुद्रोही वक्तव्ये केली. अमोल मिटकरी असे हिंदुद्रोही वक्तव्य करत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, तसेच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी हसून त्यांच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला. Tags : Featured NewsHinduismहिंदु विरोधीहिंदुविरोधी वक्तव्येRelated Newsमाता जिजाबाईंप्रमाणे मुलांमध्ये संस्कारांचे बीजारोपण करा – पू. साध्वी ॠतंभरा January 10, 2025पुणे येथे दत्त मंदिराजवळच चादर टाकून अनधिकृतपणे उभारलेली ३ थडगी हिंदुत्वनिष्ठांनी हटवली January 9, 2025सांकवाळ येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी फेस्ताचे आयोज करण्यास अनुमती देऊ नका January 8, 2025 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
पुणे येथे दत्त मंदिराजवळच चादर टाकून अनधिकृतपणे उभारलेली ३ थडगी हिंदुत्वनिष्ठांनी हटवली January 9, 2025
सांकवाळ येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी फेस्ताचे आयोज करण्यास अनुमती देऊ नका January 8, 2025