मुंबई – एम्.पी. अहमद यांच्या मालकीचे ‘मलबार गोल्ड अँड डायमंड्स’ या सोने आणि हिरे यांच्या दागिन्यांची विक्री करणार्या आस्थापनेने अक्षय्य तृतीयेच्या प्रीत्यर्थ दागिन्यांचे विज्ञापन प्रसारित करतांना अभिनेत्री करीना कपूर खान यांना दागिने घालून दाखवण्यात आले; मात्र त्यांच्या कपाळावर टिकली नव्हती. याचा हिंदूंनी विरोध केल्यानंतर आता करीना कपूर खान यांच्याऐवजी अभिनेत्री तमन्ना भाटिया यांचे टिकली लावलेले आणि दागिने घातलेले विज्ञापन प्रसिद्ध करण्यात आले आहे; मात्र हिंदूंच्या विरोधावरून या आस्थापनाकडून कोणतीही क्षमायाचना करण्यात आलेली नाही किंवा अधिकृतरित्या याविषयी कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
HJS impact !
Hindus appreciate Malabar Gold’s gesture of withdrawing the insensitive advt featuring Kareena Kapoor Khan & honoring the sentiments of Hindus.We hope that other brands will also respect Hindu culture & sentiments in their advertisements. https://t.co/pXZHOsUIyz pic.twitter.com/8315d6sEnk
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) April 23, 2022
हा तोंडदेखला पालट असल्याने या आस्थापनाच्या हिंदुविरोधी भूमिकेला हिंदूंकडून विरोध कायम असल्याचे सांगितले जात आहे.
हे पहा –
♦ हिन्दू जनजागृति समिति आयोजित : ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ में “‘हिन्दू त्योहारों में हिन्दूविरोधी प्रचार ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !”