Menu Close

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीवरील ३ भोंगे हटवले !

काही दिवसांपूर्वीच करण्यात आला येथील श्रीकृण मंदिरांवरील भोंग्याचा आवाज न्यून !

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील श्रीकृष्ण मंदिरावरील भोंग्याचा आवाज न्यून करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. आता येथील ईदगाह मशिदीवरील ३ भोंगे काढण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवान न्यून करण्याचे आवाहन केल्यानंतर हे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयानंतर शुक्रवार, २२ एप्रिलला नमाजपठण ध्वनीक्षेपकाविनाच करण्यात आले. येथील भोंगे पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.

याविषयी मशिदीच्या व्यवस्थापन समितीचे सचिव तनवीर अहमद यांनी सांगितले की, मशिदीवरील ३ भोंगे काढण्यात आले आहेत आणि केवळ एक भोंगा ठेवण्यात आला आहे. त्याचा आवाज न्यून करण्यात आला असून तो मशिदीबाहेर जाणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *