Menu Close

भोपाळमधील मदरशांत सीसीटीव्ही कॅमेरे लावा ! – भाजपचे आमदार रामेश्‍वर शर्मा

मुसलमानांचे भोपाळ शहर काझी (न्यायाधीश) यांचीही मशिदींमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणी

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. सरकारी यंत्रणांनी ते स्वतःहून बसवणे आवश्यक आहे. त्याही पुढे जाऊन राष्ट्रविघातक आणि समाजविघातक कारवायांमध्ये गुंतलेल्या मशिदी आणि मदरसे यांना टाळे ठोकणे आवश्यक !

भाजपचे आमदार रामेश्‍वर शर्मा

भोपाळ (मध्यप्रदेश) – सरकारी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. आता मदरशांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. ‘मौलवी विद्यार्थ्यांना काय शिकवत आहेत आणि ते काय शिकत आहेत’, हे सर्वांना कळायला हवे, अशी मागणी येथील भाजपचे आमदार रामेश्‍वर शर्मा यांनी केली आहे. राज्यातील खरगोन येथे रामनवमीच्या मिरवणुकीवर मशिदीवरून झालेल्या दगडफेकीच्या घटनेनेनंतर भोपाळ शहरचे काझी यांनीही मशिदींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सूत्र मांडले होते. त्यानंतर आमदार शर्मा यांनी वरील मागणी केले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *