Menu Close

ब्राह्मणांविषयी अपशब्द वापरणाऱ्या आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात संभाजीनगर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !

संभाजीनगर – ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे झालेल्या एका कार्यक्रमात ब्राह्मण समाजाविषयी अपशब्द वापरणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या निषेधार्थ येथील क्रांती चौक येथे २२ एप्रिल या दिवशी शहरातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांतील हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलन केले. ‘मदाऱ्याप्रमाणे मिटकरी यांचा बोलावता धनी वेगळाच आहे’, असा आरोप करत हे दर्शवण्यासाठी आंदोलकांनी माकडाची प्रतिमाही आंदोलनस्थळी ठेवली होती. त्याच्या गळ्यात ‘अनमोल मटनकरी’ अशी पाटी लावली होती. ‘मिटकरी यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याविषयी गुन्हा नोंद करावा, त्यांना अटक करावी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या आमदारकीचे त्यागपत्र घ्यावे’, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी या वेळी केल्या.

या प्रसंगी सर्वश्री संदीप कुलकर्णी, पंकज पाठक, अभिषेक कादी, ब्राह्मण महिला मंचच्या श्रीमती विजया कुलकर्णी, विनोद मांडे, गौरी कुलकर्णी, स्नेहा पारीक, तेजस व्यवहारे, गीता आचार्य, विश्व हिंदु परिषदेचे सर्वश्री शैलेश पत्की, सौरभ पालकर, मनोज जोशी आदी उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *