Menu Close

पूज्यपाद संतश्री आसारामजीबापू यांसह प्रज्ञासिंह ठाकूर आणि पीठाधीश्‍वर अमृतानंद देवतीर्थ यांना कुंभस्नानाला सोडण्याची मागणी !

गोरक्षा, संत सुरक्षा आणि राष्ट्र निर्माण यांसाठी हिंदुत्वनिष्ठांची बैठक !

Aasarambapu-Press-Conference
डावीकडून डॉ. गंगाराम तिवारी, पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे, श्री. राजेश शर्मा, स्वामी स्वात्मबोधानंदजी महाराज आणि स्वामी अशोकानंदजी

उज्जैन – कोणताही आरोप सिद्ध झालेला नसतांना कारागृहात बंदी असलेले पूज्यपाद संतश्री आसारामजीबापू, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, पीठाधीश्‍वर स्वामी अमृतानंद देवतीर्थ महाराज, स्वामी असिमानंद, संत नारायण प्रेमसाई, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित विविध कारागृहात बंद आहेत. या सर्वांना सिंहस्थ स्नान आणि दर्शन यांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी संस्कृती रक्षक संघाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.

६ मे या दिवशी प्रेस क्लब येथे आयोजित गोरक्षा, संत सुरक्षा आणि राष्ट्रनिर्माण या विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये संस्कृती रक्षक संघाचे राष्ट्रीय संयोजक श्री. राजेश शर्मा, श्रीरामबालक महात्यागी महाराज, स्वामी स्वात्मबोधानंद महाराज, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, भारत जागृतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्वामी अशोकानंदजी महाराज उपस्थित होते.

याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या संदर्भात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांना ३ मे या दिवशी भेटून निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. तर ५ मे या दिवशी उज्जैनचे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना या संदर्भात तात्काळ व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली.

अटकेत असणार्‍या हिंदूंच्या संतांना सिंहस्थ पर्वासाठी जामीन देऊन धार्मिक स्वातंत्र्य द्यावे ! – हिंदु जनजागृती समितीची केंद्रशासनाकडे मागणी

उज्जैन – १२ वर्षांनंतर येणार्‍या सिंहस्थ पर्वासाठी जाण्याची अनुमती शासनाने कारागृहात असणार्‍या संतांना द्यावी, अशा मागणीचे निवेदन ४ मे २०१६ या दिवशी हिंदु जनजागृती समितीकडून शासनाला देण्यासाठी वैदिक सनातन धर्म अन् राष्ट्र रक्षा अभियानाचे डॉ. गंगाराम तिवारी, तसेच योग वेदांत सेवा समितीचे श्री. राजेश शर्मा यांना देण्यात आले. हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे असून या निवेदनात कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या आणि गुन्हा सिद्ध झालेला नसतांनाही कारागृहात असलेल्या संतांना सिंहस्थ पर्वासाठी जामीन देऊन शासनाने त्यांना धार्मिक स्वातंत्र्य द्यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *