संपूर्ण देशात अशा प्रकारे नमाजपठण करणार्यांवर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे आणि अशा कायदाद्रोह्यांकडून पुन्हा अशी कृती न करण्याचा त्यांच्यावर धाक निर्माण झाला पाहिजे !
आगरा (उत्तरप्रदेश) – येथे विनाअनुमती रस्त्यावर नमाजपठण केल्यावरून पोलिसांनी १५० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. एम्.एम्. गेट येथील गुळाच्या बाजारातील इबादतगाह येथे २ एप्रिल या दिवशी हे नमाजपठण करण्यात आले होते. पोलिसांचा आरोप आहे की, रस्त्यावर नमाजपठण करण्यात आल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले. तसेच कलम १४४ च्या उल्लंघनावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नमाजपठणाचा अखिल भारतीय हिंदु महासभेने विरोध केला होता.