राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची अश्लाघ्य अन् जातीवाचक टीका
कोल्हापूर – सुतारकाम करणे हा सुताराचा धंदा आहे, चर्मकाराचा चप्पल विकणे हा धंदा आहे. तो त्यांचा धर्म नाही. त्याचप्रकारे पूजा करणे, हा पुजार्यांचा धर्म नसून धंदा आहे; मात्र पुजारीच आता वेगवेगळ्या धंद्यांत उतरले आहेत. ‘त्यामुळे देवळात १०० टक्के आरक्षण यांचेच कसे ?’, अशी अश्लाघ्य आणि जातीवाचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अन् अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तपोवन येथे झालेल्या झालेल्या ‘संकल्प सभे’त भुजबळ यांनी हे वक्तव्य केले. (देवळात पुजारी ‘पूजा’ ही भक्ती आणि समर्पण या भावनेतून करतात. ‘पूजा’ ही कधीही धंदा म्हणून केली जात नाही. ज्यांची दृष्टी आणि विचार दूषित आहेत, अशा राजकीय नेत्यांना मात्र देवतांची पूजासुद्धा ‘धंदा’च वाटते ! सातत्याने देवता, पुरोहित, राष्ट्रपुरुष यांची विविध माध्यमांतून विटंबना करणार्या राष्ट्रवादी काँग्रेसला हिंदू मतपेटीच्या माध्यमातून जागा दाखवून देतील, हे तिने लक्षात ठेवावे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)