Menu Close

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी !

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे शिवसेना आमदार दिवाकर रावते यांना निवेदन

शिवसेनेचे आमदार  श्री. दिवाकर रावते यांना निवेदन देतांना कृती समितीचे सदस्य आणि हिंदुत्वनिष्ठ
कोल्हापूर – शिवछत्रपतींचा अमूल्य ठेवा असलेला विशाळगड राज्याचा पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज दुरवस्थेत आहे. तरी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच गडावरील मंदिरे आणि योद्ध्यांची स्मारके यांचा जीर्णाेद्धार करावा, या मागणीसाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने शिवसेनेचे आमदार श्री. दिवाकर रावते यांना निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यावर या संदर्भात लक्ष घालण्याचे आश्वासन श्री. रावते यांनी दिले.

या वेळी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, सर्वश्री विराग करी, बाळासाहेब नलवडे, बंडा पाटील, धर्मप्रेमी श्री. रामभाऊ मेथे, शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख श्री. संतोष चौगले, श्री. रणजित आयरेकर, ‘महाराष्ट्र सोलजर्स रेस्क्यू टिम’चे श्री. सुरेश पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे आणि श्री. दीपक कातवरे, तसेच विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *