Menu Close

बेंगळुरू येथील ख्रिस्ती शाळेत विद्यार्थ्यांना बायबल आणणे बंधनकारक केल्याने हिंदू संघटनांचा विरोध

क्लेरेन्स हायस्कूलचा विद्यार्थ्यांना शाळेत बायबल आणणे आवश्यक असल्याचा आदेश
बेंगळुरू (कर्नाटक) – येथील क्लेरेन्स हायस्कूल व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना शाळेत बायबल आणणे आवश्यक असल्याचा आदेश दिला आहे. शाळेच्या या निर्णयाला हिंदु संघटनांनी विरोध चालू केला आहे. या वादावर शाळेने म्हटले आहे, ‘मुलांना पवित्र ग्रंथातील चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात.’ (मुलांना पवित्र ग्रंथांतील चांगल्या गोष्टी शिकवण्याला कुणाचाही विरोध असणार नाही; मात्र शाळेने हिंदूंच्याही पवित्र ग्रंथांतील चांगल्या गोष्टीही शिकवण्याचा निर्णय का घेतला नाही ? शाळेकडे केवळ बायबल हे एकच पुस्तक आहे, तर हिंदूंकडे अनेक धर्मग्रंथ आहेत ज्यामुळे मुलांवर चांगले संस्कार होऊ शकतात ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात)

क्लेरेन्स हायस्कूल प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पालकांकडून एका अर्जावर हमी घेतली आहे की, ते त्यांच्या मुलांना बायबल शाळेत आणण्यास हरकत घेणार नाहीत. याला हिंदु संघटनांनी ‘हा निर्णय म्हणजे शिक्षण कायद्याचे उल्लंघन आहे’ असे म्हटले आहे.

(सौजन्य : Tv9 Kannada)

हिंदु जनजागृती समितीचा विरोध

 

हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते मोहन गौडा

हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते मोहन गौडा यांनी म्हटले आहे की, शाळा ख्रिस्ती नसणार्‍या विद्यार्थ्यांना बायबल वाचण्यास भाग पाडत आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *