Menu Close

बागपत (उत्तरप्रदेश) येथे वृद्ध पाद्य्राकडून ११ वर्षीय मुलीवर बलात्कार

 

बागपत (उत्तरप्रदेश) – येथील ललियाना गावात ऑल विट या ६७ वर्षीय पाद्य्राला ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. पीडित मुलीचे कुटुंब चर्चजवळच रहाते. हा पाद्री मूळचा तमिळनाडूतील कन्याकुमारी येथील फुत्तुर गावातील रहाणारा आहे.

पीडित मुलीच्या आईने सांगितले की, आम्ही पुष्कळ गरीब आहोत. दिवसभर मी पती समवेत शेतात काम करतेे आणि मुलगी घरी असते. पाद्य्राने तिला चर्चमध्ये बोलावले आणि तिला पैसे देऊन तिला अश्‍लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर बलात्कार केला. गावातील काही जणांनी माझ्या मुलीकडे पैसे पाहून आणि ती दुकानातून साहित्य खरेदी करत असल्याचे पाहून आम्हाला कळवले. यानंतर आम्ही मुलीला पैशांविषयी विचारल्यावर तिने घडलेली घटना सांगितली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *