चांगले गुण मिळवण्यासाठी येशूची पूजा करण्याची विद्यार्थ्यांना केली जात आहे सक्ती !
चेन्नई (तमिळनाडू) – दक्षिण भारतात हिंदूंच्या धर्मांतराची प्रकरणे आता नित्याची झाली आहेत. आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा ही राज्ये जिथे ख्रिस्त्यांकडून हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठीचे गड बनले आहेत, तिथे तमिळनाडूतही या हिंदुविरोधी षड्यंत्राने कहर केला आहे. राज्यात शिक्षणाच्या नावाखाली ख्रिस्ती पंथाचा प्रचार उघडपणे चालू आहे. ‘चांगल्या गुणांसाठी येशूची पूजा करा ! हिंदू हे सैतान आहेत’, असे सांगून विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. राज्यातील तिरुनेलवेली येथे रंजन (नाव पालटले आहे) याने या धर्मांतर प्रकरणाची माहिती ‘न्यूज १८’ या
वृत्तवाहिनीला दिली.
३० वर्षीय रंजनने सांगितले की, शाळेत त्याला चांगले गुण मिळवण्यासाठी येशूचे अनुसरण करण्याचा सल्ला देण्यात आला होता. ‘‘त्याने येशूखेरीज इतर कोणत्याही देवाची उपासना करू नये.
यामुळे त्याच्या शरिराला कोणतीही समस्या उद्भवणार नाही किंवा तो जीवनातील कोणत्याही क्षेत्रात कधीही अपयशी ठरणार नाही.’’ रंजनच्या वडिलांनी सांगितले की, जेव्हा त्यांना या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी तात्काळ त्यांच्या मुलाला त्या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. या प्रकरणी त्यांनी आधीच्या शाळा प्रशासनाकडे तक्रारही केली होती; परंतु कुणीही गांभीर्याने कारवाई केली नाही.
काही दिवसांपूर्वी कन्याकुमारी येथील एका शाळेत सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीने प्रशासनाकडे तक्रार केली होती की, तिच्या शाळेतील एक शिक्षक तिला आणि तिच्या इतर वर्गमित्रांना बायबलचे वाचन करण्यास सांगतो अन् हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती सैतान असल्याचे म्हणतो. या घटनेविषयी प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधल्यानंतर त्या शिक्षकाला शाळेतून निलंबित करण्यात आले होते.
‘न्यूज १८’ वृत्तवाहिनीच्या या विशेष अहवालानुसार शिक्षणाच्या नावाखाली धर्माचा प्रसार हा केवळ शाळांपुरता सीमित नाही. शिकवणी वर्गांमध्येही तो चालू आहे. धर्मांतराच्या विरोधात कार्य करणारे भास्कर नावाचे गृहस्थ म्हणाले की, प्रत्येक आठवड्याला त्यांच्यासमोर धर्मांतराची किमान २-३ प्रकरणे येतात.