कलाडी (केरळ) – येथील श्री शंकरा संस्कृत विद्यापिठात नमाज आणि बांग आयोजित केल्याने वाद निर्माण झाला. धर्मांध ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एस्.डी.पी.आय.) आणि जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ.आय.) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यापिठात नमाज आणि बांग ध्वनीक्षेपकावरून मोठ्याने म्हणण्यात आली.
१. विद्यापिठाचे कुलगुरु बनू इच्छिणाऱ्या एका शिक्षकाच्या साहाय्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
२. ‘ज्या महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी महाविद्यालयामध्ये रक्षाबंधनाच्या कार्यक्रमावर बंदी घातली होती, त्यांनी विद्यापिठामध्ये अलीकडेच इफ्तार पार्टीला अनुमती दिली’, असे सांगण्यात आले.
३. मुसलमान विद्यार्थ्यांना दिवसातून पाच वेळा नमाज पढण्याची सोय या विद्यापिठात प्रदीर्घ काळापासून करण्यात येत आहे.
४. जगद्गुरु आदि शंकराचार्यांच्या जन्मस्थानी असलेले हे विद्यापीठ आता इस्लामी उपक्रमांना पाठिंबा देत आहे. जे लोक आदि शंकराचार्यांचा पुतळा विद्यापिठात लावण्याच्या विरोधात होते, तेच लोक आता इस्लामच्या कारवायांचे समर्थन करत आहेत.
५. विद्यापिठाच्या या इस्लामी कारवायांच्या विरोधात हिंदु संघटना केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांच्याकडे तक्रार करणार आहेत.