न्यायालयाचा आदेश नाकारत ‘अंजुमन इंतजामिया मस्जिद कमेटी’ची चेतावणी !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – वाराणसीच्या दिवाणी न्यायालयाकडून ३ ते १० मे या काळात काशी विश्वनाथ मंदिर, ज्ञानवापी मशीद, श्रुंगारगौरी मंदिर आणि तेथील अन्य परिसर यांचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्याचा आदेश देण्यात आला आहे. न्यायालयाने मशिदीच्या आतील भागाचेही सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्यास सांगितले आहे; मात्र याला ‘अंजुमन इंतजामिया मस्जिद कमेटी’कडून विरोध करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासन आणि वाराणसी पोलीस आयुक्त यांनी यापूर्वी न्यायालयाकडे सुरक्षा आणि शांतता यांच्या स्थितीवरून सर्वेक्षण अन् चित्रीकरण यांना स्थगिती देण्याची मागणी केली होती.
काशी विश्वनाथ मंदिर और ज्ञानवापी मस्जिद परिसर में स्थित मां श्रृंगार गौरी मंदिर समेत अन्य विग्रहों और स्थानों की वीडियोग्राफी पर थम नहीं रहा विवाद | @RoshanAajTak https://t.co/XL4ctCOQcy
— AajTak (@aajtak) April 28, 2022
न्यायालयाच्या अवमानाचा परिणाम आम्ही भोगण्यास सिद्ध आहोत !
या संदर्भातील खटल्यातील मुसलमानांचे पक्षकार अंजुमन इंतजामिया मस्जिद कमेटीचे सहसचिव सय्यद महंमद यासिन यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत न्यायालय आयुक्तांचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण यांचा विरोध केला जाईल. ज्ञानवापी मशिदीच्या आत कुणालाही जाऊ देणार नाही. आम्ही त्याला विरोध करू. न्यायालयाचा अवमान झाला, तरी त्याचा परिणाम आम्ही भोगण्यास सिद्ध आहोत; मात्र मशिदीच्या आता जाऊ देणार नाही. हे सर्व प्रकरण श्रुंगारगौरी मंदिराचे आहे; मात्र हिंदूंकडून ज्ञानवापी मशिदीलाही यात सहभागी करण्याचा प्रयत्न झाला. यामुळेच २ वेळा आयुक्तांकडून सर्वेक्षण आणि चित्रीकरण होऊ शकले नाही. सर्वेक्षण आणि चित्रीकरण यांचा सर्व प्रकार केवळ धार्मिक द्वेष आणि राजकीय कारणे यांमुळे केला जात आहे.