मुंबई : झाशीच्या राणीचा आदर्श ठेवून महिलांवरील अन्याय आणि अत्याचार रोखणे अन् धर्मपरंपरांचे रक्षण करणे यांसाठी कार्यरत असलेली हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणीची शाखा आता मुंबई येथे सक्रीय होत आहे. १४ मे या दिवशी मुंबई येथे रणरागिणी शाखेच्या उद्घाटनचा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त ६ मे या दिवशी रणरागिणी शाखेच्या महिलांनी मुंबईची ग्रामदेवता श्री मुंबादेवीचे दर्शन घेऊन राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी देवीचा आशीर्वाद घेतला.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व रणरागिणींनी श्री मुंबादेवीच्या चरणी प्रार्थना केली. या वेळी रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर आणि अन्य महिला उपस्थित होत्या. देवीचा आशीर्वाद घेतल्यावर रणरागिणींनी हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्, अशा उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.
आज पुणे शाखेचे उद्घाटन
हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणीच्या पुणे शाखेचा उद्घाटन समारंभ ऐतिहासिक लाल महालामध्ये ८ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी ७ मे या दिवशी या कार्यक्रमाची माहिती पुणे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात