हिंदु जनजागृती समितीची उत्तरप्रदेश सरकारकडे मागणी
वाराणसी (उत्तरप्रदेश) – बनारस हिंदु विश्वविद्यालयामध्ये इफ्तार पार्टी आयोजित केल्यानंतर परिसरातील भिंतीवर हिंदुविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या. हा राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर विषय आहे. राज्यातील योगी आदित्यनाथ सरकार आणि राज्यपाल यांच्याकडे आमची मागणी आहे की, या घटनेची तात्काळ चौकशी करावी. ‘यामागे कुणाचे षड्यंत्र आहे ?’, ‘कोण सूत्रधार आहे ?’, ‘इफ्तार पार्टीशी त्यांचा काय संबंध आहे ?’, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. तसेच ‘यापुढे या विश्वविद्यालयात इफ्तार पार्टीच्या आयोजनावर बंदी घालण्यात यावी’, अशी मागणीही समितीने केली आहे.