सहरसा (बिहार) – येथे पोलीस ठाण्यात मुलाच्या सुटकेसाठी गेलेल्या एका महिलेकडून पोलीस अधिकार्याने मालिश करून घेतल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या महिलेच्या मुलाला पोलिसांनी अटक केली असून त्याची सुटका करावी, यासाठी ही महिला पोलीस ठाण्यात गेली होती. मालिशची घटना एक मास पूर्वीची असल्याचे सांगितले जात आहे. शशि भूषण सिन्हा असे पोलीस अधिकार्याचे नाव आहे. पोलीस अधीक्षकांनी या घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिला असून या प्रकरणी पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला निलंबित करण्यात आले आहे.
दरोगा ने घूस में मांगी बॉडी मसाज:बिहार के सहरसा में केस रफा-दफा कराने आई महिला से थाने में कराई तेल मालिश; सस्पेंडhttps://t.co/cfaxz9PnEK#biharpolice #Bihar @bihar_police pic.twitter.com/qRsnfFW7ID
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) April 29, 2022